• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेवयाचा उपमा; मिनिटांत होईल तयार

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेवयाचा उपमा; मिनिटांत होईल तयार

शेवयांचा उपमा तयार करण्याची खुप सोपी पद्धत आहे त्याचबरोबर हा स्वादिष्ट पदार्थ चवीला उत्तम आणि बनवायला सोपा आहे. या शेवयांचा उपमा घरच्या घरी कसा तयार करायचा यासाठी संपूर्ण रेसिपी वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 10, 2026, 19:22 IST|Updated: Nov 10, 2026, 19:47 IST
joinshare
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेवयाचा उपमा; मिनिटांत होईल तयार

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
डोंबिवलीत खळबळ! 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर ब्रेकअप, गर्लफ्रेंडसह तिचे आई-वडील घरात असताना बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

डोंबिवलीत खळबळ! 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर ब्रेकअप, गर्लफ्रेंडसह तिचे आई-वडील घरात असताना बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

2

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! भाजपच्या महापौरांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, आमदाराने सांगितले धक्कादायक कारण

3

भारत पाकिस्तान सामन्यात नाणेफेकीच्या वेळी ड्रामा! क्रिकेट प्रेझेंटरकडून मोठी चूक

4

IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकले, भारतासमोर गोलंदाजीचे आव्हान! पहा दोन्ही संघाची Playing 11

5

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नेमकी कशामुळे? ग्राहकांना दिलासा देणारी 3 कारणे आहेत? आताच घ्या जाणून!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सकाळच्या नाश्ताला रोज तेचतेच खाऊन कंटाळला असाल तर मग आज या लेखामध्ये एक युनिट नाश्त्यासाठी रेसिपी सांगणार आहोत. जर तुम्ही रोज पोहे, रव्याचा उपमा याप्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर तुमच्यासाठी शेवयांचा उपमा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांना नेहमीच्या पोहे, पराठा आणि सँडविचचा कंटाळा आला आहे. दक्षिण भारतामध्ये भारतीय पद्धतीने शेवयांचा उपमा तयार केला जातो त्याची चवही खूप वेगळी असते.

शेवयांचा उपमा तयार करण्याची खुप सोपी पद्धत आहे त्याचबरोबर हा स्वादिष्ट पदार्थ चवीला उत्तम आणि बनवायला सोपा आहे. या शेवयांचा उपमा घरच्या घरी कसा तयार करायचा यासाठी संपूर्ण रेसिपी वाचा.

शेवयांचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बारीक शेवया – 2 कप
रिफाइंड तेल – 2 टेबलस्पून
मोहरी – 1 चमचा
जिरे – 1 चमचा
उडीद डाळ – 1 मोठा चमचा
हिरव्या मिरच्या – 1 (उभ्या कापलेल्या)
कढीपत्ता – 9-10
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
शेंगा – 1/2 कप (तुकडे करून)
गाजर – 1/2 कप (तुकडे केलेले)
वाटाणे – 1/2 कप
टोमॅटो प्युरी – 1/2 कप
हळद पावडर – 1/2 चमचा
मीठ – चवीनुसार
भाजलेले शेंगदाणे – 2 मोठे चमचे
पाणी – 2.5 कप

कसा बनवायचा शेवयाचा उपमा?

शेवयाचा उपमा तयार करण्यासाठी सर्वात आधी एक तवा घ्या आणि तो गॅसवर ठेवा, त्यामध्ये शेवया घाला. मंच आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यत त्या शेवया 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर शेवया भाजल्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्या. आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ, मोहरी आणि जिरे घालून तडतडू द्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला, मग चिरलेला कांदा घालून 1-2 मिनिटे चांगले परतून घ्या. कांदा परतल्यावर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घाला. चिरलेले गाजर, घेवडा आणि वाटाणे घालून सर्व व्यवस्थित मिसळा आणि भाज्या 3-4 मिनिटे शिजू द्या.

भाज्या शिजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी आणि अडीच कप पाणी घालून चांगले मिसळून घ्या आणि पाण्याला उकळी येईपर्यत शिजवा. भाज्या शिजल्यानंतर आणि पाणी उकळल्यानंतर भाजलेल्या शेवया घालून चांगले मिसळून घ्या. पातेल्यावर झाकण ठेवून 5-6 मिनिटे शिजू द्या. शेवया पूर्णपणे शिजल्या आहेत आणि सर्व पाणी आटले आहे याची खात्री करा. शेवयांचा उपमा पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा. तो एका वाढण्याच्या भांड्यात काढून घ्या आणि भाजलेल्या शेंगदाण्यांनी सजवा. तुमचा स्वादिष्ट आणि गरमागरम शेवयांचा उपमा तयार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
recipes
Lifestyle News
Marathi News