प्रेमात प्रेमाशिवाय भांडण, वाद होणे स्वाभाविक आहे. पण अनेक वेळा प्रत्येक प्रेम हे लग्नाच्या नात्यापर्यंत पोहोचत नाही. डोंबिवलीतील बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील नात्याचे एक भयानक अंत झालं. मिळालेल्या माहितीनुसार 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्यामुळे बॉयफ्रेंडला राग अनावर झाला. त्याने गर्लफ्रेंडचे घर जाळलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याने घरात त्याची एक्स गर्लफ्रेंड, आई वडील असताना घराला आग लावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील एका वस्तीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी दीपेश यांचं एका तरुणीसोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून अफेयर होतं. पण त्यांच्या नात्यात काही काळानंतर वाद सुरु झाले. सतत होणाऱ्या भांडण आणि वादाला कंटाळून तरुणीने त्याच्यासोबत नातं तोडलं. तिने दीपेशला आपलं ब्रेकअप झालं आहे. मला आता भेटू किंवा फोन करु नकोस. गर्लफ्रेंडच्या ब्रेकअपच्या निर्णयानंतर दीपेशला भयानक राग आला. त्याने या रागाच्या भरात प्रेयसीचं घर गाठलं. तिथे जाऊन त्याने घरात प्रेयसी, तिची आई वडील असतानाच घराला आग लावली.
घराला आग लावल्याचे समजताच तरुणी आणि तिची आई-वडील घरातून तातडीने पळाले. त्यामुळे सुदैवाने या भीषण आगीतून तिघांचा जीव वाचला आहे. तर या घटनेमुळे परिसरात भीतीदायक वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी गेले आणि त्यांनी तपास केला. पीडितांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दीपेश रस्तोगीला अटक केली आहे.
पंढरपूरमधील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजा भिंगे यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या हत्येप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या २०१७ मधील हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे
या प्रकरणांमध्ये पुणे येथून नागे नावाचा शूटर बोलविण्यात आला होता. हा शूटर काही दिवस पंढरपूरमध्ये राहून त्याने भिंगे यांची रेकी केली होती. जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडण्याच्या वेळेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
हत्येनंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. दोघांना सुरुवातीला अटक करण्यात आली, तर उर्वरित तिघांना गुजरातमधील सोमनाथ येथून पकडण्यात आले. हत्येसाठी वापरलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.