सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर शहरात शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांची हत्या केल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी गुजरातमधील अहमदाबादमधून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच पोलिसांना अटक केली असून या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर जुन्या राजकीय वैमनस्यातून राजा भिंगेंची हत्या झाल्याचा संशय आहे.
राजा भिंगे यांची मंगळवारी रात्री दहा वाजता हत्या झाली. मंगळवारी रात्री घराबाहेर शतपावली करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या राजा भिंगे यांच्या पोटाला आणि एक गोळी किडनीला लागली. घटनेनंतर राजा भिंगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी अहमदाबादमधून तिघांना अटक केली त्यापूर्वी पंढरपूरमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांना तपासात असं अशी माहिती हाती लागली की, 2017 मध्ये तत्कालीन नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या हत्येशी राजा भिंगे हत्येचा संबंध आहे. तपासात असं समोर आलं की, नामदेव भोईटे हत्या प्रकरणात राजा भिंगे हा आरोपी होता. पण तपासात असंही समोर आलं की, राजा भिंगे आणि नामदेव भोईटे हे एकमेकांचे चांगले मित्र होते, अशी माहिती मिळाली आहे. भोईटे हत्या प्रकरणात राजा भिंगेवर गुन्हा दाखल झाला होता आणि तो तुरुंगातही गेला होता. याच जुन्या खुनाच्या वादातून राजा भिंगेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.
मिरज इथल्या रुग्णालयात नातेवाईकावर उपचार सुरु आहे, हे कळतात नामदेव भोईटे त्यांच्या भेटीसाठी निघाले. भेट घेतल्यानंतर ते पुन्हा पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी त्यांची गाडी खरशइंग फाट्यावर पोहोचली. त्यावेळी राजा भिंगे त्यांच्यासोबत होते. राजाने लघवीच्या बहाणेने गाडी थांबवली. त्यानंतर हल्लेखोरांनी भोईटेंना गाडीबाहेर खेचले आणि त्यांच्यावर 30 हून अधिक कोयत्याने वार केले. या भयानक हल्ल्यामध्ये भोईटेंची जागीच मृत्यू झाला.