• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी दिलासादायक बातमी आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास काय यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 15:43 IST|Updated: Nov 20, 2026, 15:47 IST
joinshare
पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Image Credit: police bharti physical test female

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

2

'नावामुळेच मोहम्मद सिराजला संघात घेतलं नाही,' काँग्रेस खासदाराच्या विधानाने गदारोळ! भाजपाने दिलं प्रत्युत्तर

3

आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा

4

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

5

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.


वर्षभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यामुळे आता तरुणींच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरणार नाही. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी संबंधित तरुणीला मासिक पाळी असल्यास त्यांना काही दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी नेमके नियम आणि अटी काय आहे त्या जाणून घ्या.

पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा

पोलीस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी या दोन्ही महत्त्वाच्या असतात. अनेक वेळा तरुणींना शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी येते. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत वाया जाते. पण आता यापुढे असं होणार नाहीय. कारण शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मैदानावरील आरोग्य पथकाच्या तपासणीनंतर तरुणीला 5 ते 6 दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यानंतर तिची शारीरिक चाचणी घेतली जाईल. मासिक पाळीदरम्यान होणारी तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा आणि चक्कर यामुळे अनेक तरुणींना धावण्यासह इतर शारीरिक चाचण्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करता येत नव्हती. तरुणींच्या याच नैसर्गिक अडचणीची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मोठी घोषणा केली आहे.


एवढंच नाहीतर आरोग्य तपासणीच्या आधारे उमेदवाराची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानंतर तिला अतिरिक्त वेळ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे संबंधित तरुणींनी अशा परिस्थितीत भरती प्रक्रियेतील अधिकृत नियम आणि सूचनांचे पालन महत्त्वाचे राहणार आहे. एखाद्या महिला उमेदवाराची परिस्थिती अधिक मुदत देण्याची असल्यास त्याचाही विचार करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे ही सुविधा नेमक्या कोणत्या भरती प्रक्रियेला लागू आहे, आरोग्य तपासणी कोण करणार आणि मुदतवाढ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील, याबाबतची सविस्तर अधिकृत माहिती उमेदवारांनी संबंधित भरती प्राधिकरणाकडून तपासून घ्यावी लागणार आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या तरुणींनी शारीरिक चाचणीची तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्य तपासणीसंबंधी नियम यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News