न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र आता या मुद्द्याने राजकीय वळण घेतल्याचं दिसत आहे. याचं कारण काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं असून, ही टिप्पणी लज्जास्पद" असल्याचं म्हटलं आहे. 'ANI'शी बोलताना मसूद म्हणाले की, यापूर्वीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेली असतानाही केवळ नावामुळेच या मोहम्मद सिराजला अंतिम संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
काँग्रेस नेत्याने आरोप केला की, "असं म्हटलं जात आहे की, चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्याचे नाव सिराज आहे, म्हणूनच त्याला संघात घेतलं गेलं नाही. जर चांगली कामगिरी करूनही तुम्ही त्याला निवडत नसाल, तर हा भेदभाव स्पष्टपणे दिसून येतो."
#WATCH | Delhi: On Cricketer Mohammed Siraj, Congress MP Imran Masood says, "It is being said that despite his good performance, he was not given a place in the team. His name is 'Siraj ', and that is why he was not given a place. If you are not selecting him despite his good performance, the discrimination is clear."
— ANI (@ANI) November 20, 2026
इम्रान मसूद यांना प्रत्युत्तर देताना, भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर क्रिकेट संघाच्या निवडीच्या बाबतीतही 'व्होट-बँकचे राजकारण' करत असल्याचा आरोप केला आहे. "काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. काँग्रेस आता क्रिकेट संघ निवडीमध्येही 'व्होट-बँक'चे राजकारण करत आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, 'सिराजला संघातून वगळले कारण तो मुस्लिम आहे.' अरे, जडेजालाही तर वगळले होते. प्रत्येक क्रिकेटपटू भारताचे प्रतिनिधित्व करणारी जर्सी परिधान करतो. 'व्होट-बँक' आणि जातीयवादी राजकारणासाठी भारतीय क्रिकेट संघाचे विभाजन करणे थांबवा," अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
Shame on Congress! Congress now does vote bank politics even in Cricket team selection! Congress says -" Siraj was left out because he was a Muslim" Even Jadeja was left out! Every cricketer wears the jersey representing India! Stop dividing Indian cricket team for vote bank & communal politics!
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) November 20, 2026
सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठीच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून सिराजला वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, संघ व्यवस्थापनाने या वेगवान गोलंदाजाच्या अनुभवाचा विचार करायला हवा होता.
Hope India bounce back strongly. But if pace, skill and seam movement were the criteria, and 140 clicks was hard to come by, one has to ask the question. Where was MOHD SIRAJ? Experience, aggression and the ability to make things happen with the ball. Surely that counts for something!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) November 19, 2026
भारताने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या चार गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. सुनील गावस्कर यांनी मोहम्मद सिराजची निवड न होण आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. तर रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केले की, सिराजचा अनुभव आणि त्याची कामाप्रती असलेली निष्ठा पाहता, त्याला संघात स्थान मिळायला हवं होतं.
मात्र, कर्णधार शुभमन गिल आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी आपला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंबद्दल बोलताना गिल म्हणाला: "हे खूप कठीण असते. आम्ही गेल्या आठवडाभरापासून विचार करत होतो की कोणतं कॉम्बिनेशन निवडावं. कारण आमचे सर्व वेगवान गोलंदाज सध्या खूप चांगली कामगिरी करत आहेत. सिराज आणि गुरनूर या दोघांनाही संघात स्थान न मिळणे, ही नक्कीच कठीण गोष्ट आहे."
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनीही सिराजला संघातून वगळण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचं समर्थन केलं. "सिराजच्या बाबतीत काहीही चुकीचे नाही. संघ निवडताना आम्हाला हा सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ वाटला. मला नाही वाटत की सिराजला वगळण्याचा निर्णय चुकीचा होता," असे कोटक यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.