उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या धक्कातंत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचा सभापती निवडीत धक्कातंत्राचा वापर केला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रखडलेल्या ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक झाली आहे. आज शुक्रवारी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सदस्यांची निवड करताना धक्कातंत्राचा वापर करत सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीची निवड करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे सर्वाधिक 9, भाजपचे3, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य निवडण्यात आले आहेत.
शिवसेना
दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल, महेश साळवी
भाजप
भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, कमल चौधरी
राष्ट्रवादी (श प)
पल्लवी जगताप, यासीन कुरेशी
राष्ट्रवादी (अ प)
सुहास देसाई
एमआयएम
शोएब डोंगरे