IND VS NZ Test Cricket : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. यातील पहिल्या सामन्याला गुरुवार पासून सुरुवात झाली असून यातील दुसरा दिवस आज पार पडला. वेलिंगटनच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने 368 धावांची कामगिरी केली. याच्या उत्तरात स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने 100 हून अधिक धावांची पार्टनरशिप केली. यावेळी यशस्वी जयस्वालने भारताला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करताना, जयस्वालने न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि अवघ्या 66 बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले.
न्यूझीलंडमधील चॅलेंजिंग परिस्थितीला बाजूला सारून यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करून दमदार सुरुवात करून दिली. हे यशस्वी जयस्वालचं टेस्ट क्रिकेटमधील 14 वं शतक होतं. अर्धशतक पर्यंत पोहोचेपर्यंत यशस्वीने 36 धावा या फक्त बाउंड्री मारून केल्या. या अर्धशतकासह यशस्वी जयस्वालने SENA देशांमध्ये भारतीय ओपनर्समध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्याने माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर ला मागे टाकत, SENA देशांमध्ये ओपनर म्हणून 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची आपली 8 वी वेळ नोंदवली आहे.
SENA देशांमध्ये भारतीय ओपनर म्हणून तो सर्वात जास्त 50 हून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 19 वेळा अशी कामगिरी केली असून केएल राहुलने 12 वेळा 50 हून अधिकचा स्कोअर केला आहे. तर वीरेंद्र सेहवागने 10 वेळा आणि मुरली विजयने 9 व्यांदा अशी कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने या दौऱ्यावर इंडिया ए साठी खेळताना कमालीचं प्रदर्शन केलं होतं. त्याने लागोपाठ 2 सामन्यात शतक ठोकलं होतं.
भारतीय संघाची प्लेईंग 11 :
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी
न्यूझीलंड संघाची प्लेईंग 11 :
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा