• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 14:49 IST|Updated: Nov 20, 2026, 14:59 IST
joinshare
बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...
Image Credit: मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिकच्या पंचवटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी आरोपी पती आकाश जाधव याला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा जाधव असं मृत पत्नीचं नाव आहे. दोघेही मूळचे बिहारचे असून 11 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून कुटुंब महाराष्ट्रात राहत असल्याने त्यांनी आडनाव बदलून जाधव केलं होतं.

आकाशने पत्नी पूजाची ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे. पंचवटी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर सर्वजण हादरले आहेत. मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आकाशने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोरील कोमल सोसायटीत ही घटना घडली. पूजा यादव 30 वर्षांची होती.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती आकाश जाधव हा वारंवार तिच्याशी वाद घालत आणि मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीही पतीच्या त्रासाला कंटाळून पूजाने त्याला घरात कोंडून ठेवलं होतं. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी आरोपी पती आकाश जाधव याला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन RTO अधिकाऱ्याची आत्महत्या

नाशिकमध्ये निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन आरटीओ अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील राहत्या घरात त्यांनी टोकाचा निर्णय गेतला. आत्महत्येच्या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Nashik