राम पूर्णेकर यांच्या नेतृ्त्वात पूर्णेकर कुटुबीयांकडून ठाण्याच आंदोलन सुरु असताना दुसरीकडे माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी करण्यात आली.
रात्री साडेदहाच्या सुमारास सुरु झालेला हा सारा प्रकार अगदी पहाटेपर्यंत सुरु होता. याचा परिणाम अगदी सकाळच्या वाहतुकीवरही दिसून आला. नेमकं घोडबंदरवर झालं काय? नक्की कोणी आणि कशासाठी हे आंदोलन केलं जाणून घ्या...
गायमुख ते कासारवडवली आणि कासारवडवली पासून कॅडबरीपर्यंतचा मेट्रो 4चा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. संपूर्ण ट्रेन रिकामी असताना दरवाजे बंद केले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नव्या व्हिडिओनं उडाली खळबळ; कुटुंबीयांकडून अल्टिमेटम
घरांची सर्वाधिक मागणी असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने एक मोठा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. त्याबद्दलच...
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. शस्त्रांच्या खरेदीचा तपशील समोर आला असून त्या दोन व्हिडीओनंतर पोलिसांचा तपास पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या दिशेने सरकला आहे.
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; राजेंद्र शिंदे यांच्या अडचणीत वाढ
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश मिळालं आहे. मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
ठाण्यातील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्येचं नेमकं कारण काय आहे यासंदर्भात आरोपींनीच कबुली दिली आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान यावरुन प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी नाराजी जाहीर केली आहे.
सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेखहे मुंब्रा परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे पूर्वीचे सहकारी असले तरी त्यांची मुलगी एमआयएमची नगरसेविका असताना त्यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून एका महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली आहे.
बदलापूर येथे स्त्री बीजाची तस्करी करण्यात आल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या पतीची पोलिसांकडून दोन दिवस सलग चौकशी झाली. यानंतर मीनाक्षी शिंदे यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे.
एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा असून, एक फोटो व्हायरल झाला आहे.
नालासोपारा अत्याचार प्रकरणी आणखी एक तरुणीची तक्रार. रात्री पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर नालासोपारा पोलिसांनी आरोपी आरिफ शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्डनी जीवदान दिले आहे. 25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला आहे.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे.
मुंबईत 2002 मध्ये एक मुलगी आपल्या कुटुंबापासून दुरावली. तिचा कुटुंबातील सदस्यांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. पण तब्बल 24 वर्षांनी मतदानातील यादीमुळे तिचा शोध लागला.
मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहरामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या धक्कादायक हत्येसंदर्भातील हादरवून टाकणारी माहिती एसआयटीच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. नेमकं काय कळालय या तपासात पाहूयात...