नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. गेल्या वर्षाभरापासून या सोहळ्याची लगबग सुरू आहे. तब्बल दोन वर्ष हा भक्तीचा सोहळा रंगणार आहे. मुख्य धार्मिक आयोजन आणि अमृत स्नान 2027 मध्ये असणार आहे. त्यापूर्वी या सोहळ्याचा श्रीगणेशा ध्वजारोहण सोहळ्याने होणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट इथे हा सोहळा 31 ऑक्टोबरला असणार आहे. या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहे. या सोहळ्यासाठी भक्तांचीही मोठी मांदियाळी पाहिला मिळेल. त्यामुळे 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 30 ऑक्टोबर सकाळी 8 ते 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू असणार आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.
तर नियमित 30 किलोमीटरचा मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचे अंतर 55 किलोमीटर असणार आहे.
पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाशिक-पिंपळगाव बहुला-संदीप फाउंडेशन-खंबाळे-पेगलवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर या नियमित मार्गाऐवजी वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर.
त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येण्यासाठी पर्यायी मार्ग त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी जव्हार-मोखाडा-अंबोली-त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी-खंबाळे-संदीप फाउंडेशन-नाशिक या मार्गाऐवजी पुढील मार्ग निश्चित करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग : जव्हार – मोखाडा – अंबोली टी पॉइंट – वाघेरा फाटा – कोने – साप्ते – देवरगाव – गिरणारे – गोवर्धन – नाशिक.
मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्गात बदल मुंबईच्या बाजूकडून वैतरणा फाटा-पहिने-त्र्यंबकेश्वर या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्ग : वैतरणा फाटा – नाशिक – अमृत गार्डन – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – त्र्यंबकेश्वर.
पहिने-पेगलवाडी मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था पहिने-पेगलवाडी-नाशिक या मार्गावरील वाहतुकीसाठी पुढील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : पहिने – आहुर्ली – सांजेगाव – वाडीवऱ्हे – नाशिक. तर पहिने-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर या मार्गावरील वाहतुकीसाठी पुढील मार्गाचा वापर करावा.
पर्यायी मार्ग : पहिने – भिलमाळ – निरगुडपाडा – जांभुळपाडा – सापगाव – त्र्यंबकेश्वर.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलंय. वाहनचालकांनी वाहतूक अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी केले आहेत.