• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

मराठीतील गाजत असलेले आमने-सामने नाटकातील कलाकारांना तडकाफडकी नाटकातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी सविस्तर भाष्य केलं आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 28, 2026, 11:13 AM IST|Updated: Oct 28, 2026, 11:15 AM IST
joinshare
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं
Image Credit: Aamane Saamane marathi Natak

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रंगभूमीवर गाजत असलेल्या आमने-सामने नाटकातून महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या दोन कलाकारांना नाटकातून तडकाफडकी काढण्यात आल्याची माहिती समोर येतेय. अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांची जोडी आता नाटकाच्या पुढच्या प्रयोगांमध्ये दिसणार नाहीत. स्वतः कलाकरांनीच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन याची माहिती दिली. तसंच, निर्मात्यांबाबत नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

आमने सामने नाटकात लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबत रोहन गुजर आणि केतकी विलास हे दोघही महत्त्वाच्या भूमिकेत होते. मात्र नाटकाचा प्रयोग पार पडल्यानंतर अचानक दोघांनाही हा शेवटचा प्रयोग असल्याचे सांगण्यात आले, असं कलाकारांनी व्हिडिओत म्हटलं आहे.

रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं की, आता आपण भेटुयात आमने-सामने हे वाक्य आम्ही कधीच बोलू शकणार नाही. कारण आता इथून पुढे आम्ही दोघही आमने-सामने या नाटकाचा भाग नसणार आहोत. मी सात ते आठ वर्ष हे नाटक करत आहे त्याचे 670 प्रयोग. आणि केतकी साडेचार वर्ष 520 प्रयोग. 18 ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरला आमचा प्रयोग झाला. त्यानंतर आमची एक मीटिंग झाली ते आता मला सांगितलं की हा तुमचा शेवटचा प्रयोग होता, असं  रोहन गुजर याने म्हटलं आहे.

'या नाटकाने आम्हाला भरपूर काही दिलं. प्रेक्षकांचं प्रेम दिलं. म्हणजे प्रेक्षक अगदी 25-25 वेळा येऊन हे नाटक पाहत होते. आमच्या नाटकाचे तिकीट्स ब्लॅक झाले आहेत असंही आम्ही ऐकलेलं. पण त्या बदल्यात आम्हाला नीट गुडबायही दिला नाही. आम्ही आमचा शेवटचा प्रयोग नीट एन्जॉय केला नाही, आम्हाला आमचा शेवटचा प्रयोग सेलिब्रेट करता आला नाही. जर आम्हाला माहित असतं की हा आमचा शेवटचा प्रयोग आहे तर आमचे कुटुंबीय सुद्धा तो प्रयोग बघायला आले असते. तिथल्या लोकांबरोबर संवाद साधून त्यांना छान गुडबाय करता आलं असतं. म्हणजे एखाद्याने तुमच्या सुरळीत चाललेल्या आयुष्यातून पूर्वकल्पना न देता अगदी सहज उचलून फेकून देणे इतकं हे त्रासदायक होतं. लाईफ ऑफ पाय मध्ये इरफान म्हणतो की तो वाघ साधा त्याला वळून बघत नाही त्याला नीट बाय म्हणत नाही त्याचा त्याला खूप त्रास झाला तसंच काहीसं आता आपल्याला होत आहे, असंही रोहन याने म्हटलं आहे.

'आम्ही साधारण पाच ते सात वर्ष या नाटकात काम करत आहोत पण आम्हाला आमच्या निर्मात्यांनी छान गुडबायही दिलं नाही. पैशांमुळे आम्हाला या नाटकातून वेगळं केलं गेलं. पैसे या विषयावरून आपण अनेकदा एखाद्या प्रोजेक्ट सोडतो ‌ पण तो छान नोटवर सोडला जातो. प्रयोग झाल्यावर अचानक आम्हाला सांगितले गेले की आता आपण थांबतोय. आता जो झाला तो तुमचा शेवटचा प्रयोग होता हे खूपच वाईट होतं. मध्ये कोविडमध्ये दोनदा नाटक बंद झालेलं. जेव्हा ते पुन्हा सुरू झालं तेव्हा आम्ही अर्ध्या पाकिटात काम करत होतो. त्यानंतर मध्ये निर्मात्यांमध्ये वाद झाले तेव्हाही नाटक बंद झालेलं पण आम्ही आमने-सामने या नाटकासोबत कायम होतो.'

आम्हाला प्रेक्षकांचे खूप आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आमच्यावर भरपूर प्रेम केलं. पण सॉरी आता आम्ही या नाटकात यापुढे नसणार आहोत. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आम्ही या गोष्टीसाठी हा व्हिडिओ करू. ही खूप दुःख देणारी गोष्ट आहे. आमच्याकडून एक फॉर्मल व्हिडिओ किंवा मेसेज बाहेर येणे गरजेचे होतं. आता या नाटकाच्या नवीन टीमला ऑल द बेस्ट. आमचं नाटकावर खूप प्रेम आहे त्यामुळे नवीन पात्रात, नवीन रूपात आम्ही तुम्हाला भेटायला येऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Marathi News