• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

टोल नाक्यापासून 20 किमीच्या परिसरात राहणाऱ्यांना वार्षिक पासची सुविधा असून 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू होणार आहेत.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 28, 2026, 10:23 AM IST|Updated: Oct 28, 2026, 10:25 AM IST
joinshare
टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू
Image Credit: fastag annual concession pass

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

टोल नाक्यापासून 20 किमीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक गुड न्यूज आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) फास्टॅग वार्षिक पासच्या नियमांबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. टोल प्लाझापासून 20 किमीच्या परिघात राहणाऱ्या लोकांसाठी कमी किंमतीत वार्षिक पास मिळणार आहे. नवी नियमांतर्गंत आका 1500 ते 3000 रुपयांत वर्षभराचा पास घेऊ शकतो. याबाबत जाणून घेऊयात सविस्तर

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या पात्र खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने सवलतीच्या स्थानिक पासची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि वसुली) (पाचवी सुधारणा) नियम, 2026 अंतर्गत ही सुविधा 1 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नियमानुसार, टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या आणि वैध, कार्यरत FASTag असलेल्या बिगरव्यावसायिक खासगी वाहनधारकांना संबंधित टोल नाक्यासाठी वार्षिक पास घेता येणार आहे.

वार्षिक पाससाठी शुल्क किती?

1,500 रुपये : नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेरील टोल नाक्यांसाठी

3,000 रुपये : नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीतील टोल नाक्यांसाठी.

या सुविधेसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. बंदिस्त वापरकर्ता शुल्क वसुली प्रणाली (Closed User Fee Collection System) असलेल्या राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती महामार्गांवर ही सुविधा लागू होणार नाही. तसेच, पर्यायी रस्ता किंवा सर्व्हिस रोड उपलब्ध असलेल्या ठिकाणीही या पासचा लाभ मिळणार नाही.

त्यामुळे टोल नाक्यांजवळ राहणाऱ्या पात्र खासगी वाहनधारकांना या नव्या नियमांचा लाभ घेता येणार आहे.

सध्या स्थानिकांना पाससाठी 360 रुपये प्रति महिना इतके द्यावे लागतात. या हिशोबाने वर्षभरात साधारणपणे 4,320 रुपये भरावे लागत होते. नवीन वार्षिक पासमुळं नागरिकांची हजारो रुपयांची बचत होणार आहे. मात्र या पासचा लाभ घेण्यासाठी काही अटी-शर्थीं पाळाव्या लागणार आहेत.

या असतील अटी

वैयक्तिक वाहने आणि फास्टॅग - हा वार्षिक पास फक्त वैयक्तिक वापरासाठी नोंदणी केलेल्या वाहनांसाठीच वैध आहे. वाहनावर एक सक्रिय फास्टॅग असणे आवश्यक आहे. याशिवाय, पास दिला जाणार नाही.

विशिष्ट टोल प्लाझावर वापर - हा वार्षिक पास फक्त एका विशिष्ट टोल प्लाझासाठीच वैध आहे. तो फक्त त्याच टोल प्लाझावर वापरला जाऊ शकतो ज्यासाठी तो जारी करण्यात आला आहे. तो इतर कोणत्याही टोल प्लाझावर वापरला जाऊ शकत नाही.

सेवा रस्ता किंवा पर्यायी मार्ग नाही - हा पास मिळवण्यासाठी एक अत्यावश्यक अट अशी आहे की, टोल प्लाझावर सेवा रस्ता किंवा पर्यायी मार्ग नसावा. जर सेवा रस्ता किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल, तर त्या भागातील रहिवाशांना हा पास दिला जाणार नाही.

Closed User Fee Collection System: ज्या द्रुतगती मार्गांवर किंवा राष्ट्रीय महामार्गांवर बंद वापरकर्ता शुल्क संकलन प्रणालीअंतर्गत टोल आकारला जातो, तिथे हा वार्षिक पास दिला जाणार नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Infrastructure news