• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /संपूर्ण ट्रेन रिकामी दरवाजे बंद केले, सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही, रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य

संपूर्ण ट्रेन रिकामी दरवाजे बंद केले, सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही, रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य

रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. संपूर्ण ट्रेन रिकामी असताना दरवाजे बंद केले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 26, 2026, 07:21 PM IST|Updated: Oct 26, 2026, 07:30 PM IST
joinshare
संपूर्ण ट्रेन रिकामी दरवाजे बंद केले, सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही, रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मध्य रेल्वे : मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोडमडली आहे. सकाळी 10 वाजता विस्कळीत झालेली वाहतूक संध्याकाळी उशीरापर्यंत पूर्ववत झालेली नाही. यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अशातच ठाणे रेल्वे स्थानकात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांना चढू दिले नाही.  रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. 

प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची भयानक गर्दी 

दहा तासांपेक्षा अधिक वेळ मध्ये रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे. मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. अशातच ठाणे रेल्वे स्थानकात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. रेल्वे कर्मकाऱ्यांसाठी राखीव असलेल्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांना चढू दिले नाही. 

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव ट्रेन

मध्ये रेल्वेवर खास रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष लोकल धावते. CSMT ते कल्याण अशी ही लोकल आहे. ही लोकल ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर आली असताना  कल्याणकडे जाणाऱ्या या धीम्या लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला.

ठाणे रेल्वे स्थानकात ही लोकल थांबली असताना प्रवाशांनी 2 ते 3 मिनिटे विनवणी करूनही कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. या मुजोरपणाचा निषेध करत संतापलेल्या एका प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण होते. प्रवाशांसह आरपीएफचे जवान देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगत होते. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. 

 

10 तासांपासून प्रवासी खोळंबले आहेत. ट्रेन रिकामी असताना यांनी आतून दरवाजे लावून घेतले. सर्व सामान्य प्रवाशांना आत चढू दिले नाही.  रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या मुजोरपणाचा  प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Railway News
Thane