• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /वडिलांचा शिवसेनेत प्रवेश! मुंब्रा हिरवा करण्याचं आवाहन करणारी सहर म्हणाली, ‘शिवसेना फक्त हिंदुत्ववाद्यांना...’; 'शिवसेना, MIM एकत्र येतायेत तर...'

वडिलांचा शिवसेनेत प्रवेश! मुंब्रा हिरवा करण्याचं आवाहन करणारी सहर म्हणाली, ‘शिवसेना फक्त हिंदुत्ववाद्यांना...’; 'शिवसेना, MIM एकत्र येतायेत तर...'

सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेखहे मुंब्रा परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे पूर्वीचे सहकारी असले तरी त्यांची मुलगी एमआयएमची नगरसेविका असताना त्यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून एका महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 17, 2026, 11:40 AM IST|Updated: Oct 17, 2026, 12:09 PM IST
joinshare
वडिलांचा शिवसेनेत प्रवेश! मुंब्रा हिरवा करण्याचं आवाहन करणारी सहर म्हणाली, ‘शिवसेना फक्त हिंदुत्ववाद्यांना...’; 'शिवसेना, MIM एकत्र येतायेत तर...'
Image Credit: वडिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सहर पहिल्यांदाच बोलल्या

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ठाणे महापालिकेमधील प्रभाग क्रमांक 30 मधील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. एक फोटो व्हायरल झाल्यानंतर ही बातमी समोर आली. या फोटोमध्ये युनूस शेख शिवसेना नेत्यांसोबत असून, त्यांच्या गळ्यातही शिवसेनेचा भगवा गमछा दिसत आहे. अखिल भारतीय भारतीय केबल सेनेच्या कळवा मुंब्रा अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या विषयावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता 'मुंब्रा हिरवा करु' म्हणणाऱ्या सहर शेख यांनी वडिलांच्या या निर्णयावर भाष्य केलं आहे.

युनूस शेख यांना कोणत्या पदावर करण्यात आलं नियुक्त?

शिंदेंच्या पक्षांकडून युनूस शेख यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून युनूस यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात शिंदेंच्या आदेशानुसार, शिवसेना अखिल भारतीय केबल सेना अध्यक्ष कळवा-मुंब्रा विधानसभा नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक महिन्याच्या कामाचा लेखी अहवाल बाळासाहेब भवन कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टीका करणाऱ्यांना इशारा...

"वडिलांचे अभिनंदन करते मी. केबल ⁠हा आमचा खानदानी व्यवसाय आहे.  ते आधीपासून त्या संघटनेवर आहेत. ⁠मला यात काही गैर वाटत नाही. ⁠लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्याला मी काही करु शकत नाही," असं सहर शेख यांनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता यावरुन टीका करणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. "⁠टीकाकारांना योग्य वेळी उत्तर मिळेल," असं सहर शेख म्हणाल्यात.

शिवसेना आणि एमआयएम एकत्र येऊन काम केलं तर...

पुढे बोलताना सहर शेख यांनी शिवसेना आणि एमआयएम एकत्र येऊन काम करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. "शिवसेना फक्त हिंदुत्ववाद्यांना एकत्र घेवून चालत नाही तर सर्वांना एकत्र घेवून चालणारा पक्ष आहे. शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकत्र येतायेत तर तुम्हाला काय प्रॅाब्लेम आहे?" असा सवाल सहर शेख यांनी उपस्थित केला आहे.

शिंदेंशी आमचे कौटुंबिक संबंध

तसेच पुढे बोलताना, "⁠एकनाथ शिंदे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत.  ⁠वडील गेलेत त्या पक्षात मी गेलीये का? ⁠टिकाकारांना मी योग्य वेळी उत्तर देईन. ⁠जात प्रमाणत्र प्रकरण कोर्टात सुरु आहे. योग्य वेळेस मी उत्तर देईन. काही काम असेल तर मी एकनाथ शिंदे यांना भेटायला जाते," असंही सहर शेख म्हणाल्या.

भगवा आणि हिरवा दोन्ही...

मुंब्रा हिरवा करणार या विजयानंतरच्या घोषणेवरुन विचारलं असता, "⁠भगवा आणि हिरवा दोन्ही करूयात. कैसे हराया मुव्हेमेंट परत एकदा जोरदार येणार आहे," असं सहर शेख यांनी म्हटलं आहे.

युनूस शेख हे याबद्दल काय म्हणाले होते?

युनूस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला असून, ही फक्त एक केबल ऑपरेटर्सची 40 वर्ष जुनी विंग असल्याचं सांगितलं आहे. "माझा केबल आणि इंटरनेटचा व्यवसाय आहे. अखिल भारतीय केबल सेनेत यात सर्व केबल ऑपरेटर्स आहेत आणि मीदेखील आहे. आता माझ्यावर कळवा-मुंब्रा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येथील सर्व केबल आणि इंटरनेट ऑपरेटर्सना एकत्र घेऊन मजबूत करायचं आहे," असं युनूस शेख यांनी म्हटलं आहे. "माझ्या मुलीने पक्ष वाढवण्यासाठी मुंब्रा हिरवा करु म्हटलं होतं. मग हिरवा करु, ठाणे आला तर भगवा करु," असंही ते म्हणाले. जर मला पक्षप्रवेश करायचाच असेल तर एकनाथ शिंदेंच्या हातूनच नियुक्तीपत्र घेऊ असंही त्यांनी विधान केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Eknath Shinde
Thane