ठाण्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदीप पूर्णेकरांची हत्या झाल्यापासून तापलेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद आता थेट रस्त्यावर दिसू लागले असून या प्रकरणामध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाण्यात काल दिवसभर झालेल्या गोंधळानंतर घोडबंदर रोडवर प्रामुख्याने मानपाड्याजवळ मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आजही पूर्णेकरांचे कुटुंबीय नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.
शिक्षक मतदारसंघांच्या या निवडणुकीत एकूण 55 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे विभागातून 30 उमेदवार आणि अमरावती विभागातून 25 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. कोणाविरुद्ध कोण आहे रिंगणात पाहूयात...
रायगडचे शिवसेनेचे नेते, आमदार आणि मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या कथित 500 कोटींच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र सक्तवसुली संचलनालयामार्फत (ED) लिहून चौकशीची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची स्क्रिप कोणी लिहिली आहे, याबद्दल भाजपच्या प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांचे फोटो दाखवत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे.
रामदास कदम यांच्या गंभीर आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी लगचेच सडेतोड उत्तर दिलं आहे. तू यात पडू नको असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांना थेट इशाराही दिला आहे.
मनोज जरांगे यांनी जारी केलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी भाजपावर एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापला जात असल्याचा आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कथितरित्या भाजपाच्या नेत्यांनी अंतर्गत चर्चेदरम्यान जरांगेंना 500 कोटी रुपये देण्यात आल्याबद्दल भाष्य केल्याचा दावा केला. यावरुन राजकारण तापलेलं असतानाच त्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेनं उडी घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या एक विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला. 500 कोटींचा ऑडिओ बॉम्बमुळे शिंदेंच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे.
एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा आरोप केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुराव्यादाखल ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. तीन वर्षांपासून माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जरांगे यांनी बीडमधील नारायणगडावर झालेल्या त्यांच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्याला द्यायचे सांगून भाजपाकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज त्यांनी याचसंदर्भात पत्रकार परिषद घेतली
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 June 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि ते मला दिले अशी माहिती भाजपा नेत्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेवरील आरोपानंतर जरांगे आणि कदमांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. बापही तुम्हीच दाखवा,श्राद्धही तुम्हीच घाला असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिलं आहे. मी बेईमान आहे की नाही हे उद्या 11 वाजता कळेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात अभिजीत दीपकेंचा उल्लेख करत मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर 500 कोटींसंदर्भात केलेल्या आरोपांनंतर रामदास कदम संतापले आहेत. त्यांनी दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंवर बोचरी टीका केली.
उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातून टायगर श्रॉफवरील हल्ल्यावरून पोलिसांवर टीका केली. सोबतच एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले.