मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहेत. रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. तर मैत्रीच्या आडून मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंना संपण्याचा कट रचत आहे, असा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाहीतर ज्यादिवशी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या मूळावर उठण्याचा प्रयत्न केला त्यादिवशी मराठा समाज तुमच्या मूळावर आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे खरे रूप लोकांसमोर आले आहे. या आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील रामदास कदम यांना म्हणाले की, या ऑडिओ क्लिपची शिंदे साहेब आणि पोलीस यंत्रणा तपास करतील. तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही माझ्या डोक्याला डोकं लावू नका. तुम्हाला तारीख कशी माहिती झाली ते तुम्ही पोलिसांना, शिंदे साहेब आणि फडणवीसांना सांगा. हे खूप मोठं गौडबंगाल असून हे कोड आहे. धमक्या देण्याचं काम बंद करायचं. मी आदर करतोय हे शेवटचं. माझ्याबद्दल याच्यानंतर कसंच बोलायचं नाही. डोक्याच्या वर जायचं नाही. हीच तर पोट दुखी आहे.
भाजपवाले म्हणतात ते तुमचे मित्र आहेत. यांच्यासोबत बोलो तर हे बोलतात. नोकर आहे का तुमचा मी. रामदास कदम यांचं ऐकायला नोकर आहे का मी. याचं वेगळं गराहण आहे. ३२ मिनिटांची क्लिप असू दे २०० मिनिटांची क्लिप असू दे काही अडचण नाही आम्हाला. आपलं जे असतं ते खरं असं ओपन आहोत आम्ही. तुम्ही त्याची काळजी करू नका.
तुम्ही वयाने मोठे आहात मी तुमचा आदर करतो, तुम्ही आणि तुमच्या पोराने नीट बोलायचं. आम्हाला जर शिंदे साहेबांना संपवायचं असतं तर आम्ही हे काढलं नसतं. तू संपवू नकोस. तू यात पडू नकोस आणि त्यांना संपवूनही नको. गद्दारचं नाव सांगावं रामदास कदम यांनी.
ते पुढे म्हणाले की, तारीख तर आम्हाला माहितीच नाही. काय फुटाफुटी आहे, काय आहे, की तू आहेस, ते दरेकर समिती आहे दोघं जण. त्यांना माहितीये छक्के पंजे कोणते आहेत ते. हे सगळं बाहेर येऊ दे जरा. तुला जर असं चिल्लर काम करायचं आहे, बाटल कसली आहे, हे कसलं आहे. शिंदेचं एवढं आहे मग..., बस तू आता मला बोलायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.