टायगर श्रॉफवरील हल्ल्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यावर हे चेमकगिरी करणारे गेले लगेचच भेटायला. बरं हा हल्ला झाला आणि पोलिसांनी लगेचच ते हल्लेखोरही पकडले. याच कौतुक करायचं की आणखीन काहीतरी...सुदैव त्या पोराचं म्हणून तो वाचला, जर त्याला गोळी लागली असती तर मग पोलिसांनी हे गुंड पकडले असतील. उपयोग काय चाटायचंय. कोणत्या पद्धतीने सरकार चालवत आहात. संताप याच गोष्टीचा येतो. पोलीस असेल इतर संस्था असतील यांनी स्वत:ची फक्त धुणीभांडी करायची बाकी ठेवलं आहे. बाकी सगळं यांना दिलं आहे. मग कशाला तुमच्या नाकाबंदी असतात. नवरात्री चालू आहे. आमच्याकडे जरा कुठे काही झालं की लगेचच पोलीस स्टेशनला बोलवतात. या पोलिसांनाही शस्त्र घेऊन येणारी गुंड दिसले नाहीत. नाकामध्ये गोळे कोंबले होते का तुमच्या नाकाबंदीच्या वेळी. हे शस्त्र घेऊन आले कसे. पकडले तुम्ही जरुर पण जर घात झाला असता कोणत्या तोंडाने तुम्ही टिंगी वाजवली असती. हे शौर्यपदक देण्याच्या लायकीचे काम नाहीय. मुळामध्ये ते शस्त्र घेऊन आले, ते तु्म्हाला कळायला पाहिजे होतं आणि तिकडे तुम्ही त्यांना उडवायला पाहिजे होतं. तर मी म्हणेल कायद्याचा हा महाराष्ट्र आहे. पण कोणाला लाज लजा शर्म काही पण नाही.
गेल्या याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या उच्च न्यायालयामध्ये दावा केला आहे. महाराष्ट्र शहरी नक्षलवाद्यांचं केंद्र बनलं आहे. कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या शहरात शहरी नक्षलवाद आहे. हे गुंड आले होते ते तुमच्या यूपीमधून आले होते. हे येताना जाताना तुम्हाला दिसले नाही पकडले नाही. मात्र तिकडे जाताना पडकले. येताना तुम्हाला कळले नाहीत.