मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडल्यापासून महाराष्ट्रातील नेतेमंडळ एकमेकांनावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय प्रसाद लाड यांनी ती क्लिप फोडली असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर प्रसाद लाड यांनी त्या ऑडिओ क्लिपचा स्क्रिप राइटर कोण आहे याबद्दल सांगितलं आहे.
पत्रकार परिषद घेत प्रसाद लाड यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, की सपनों का सौदागरला कुठेतरी आवरलं पाहिजे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे याआधारावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले आहे की, ती ऑडिओ क्लिप कुठे बनवली, कशी बनली, ही क्लिप बनवण्यामागे कोणाचा हात आहे. आता मी स्पष्टच सांगतो ही ऑडिओ क्लिपची स्क्रिप्ट, रॉयटर, दिग्दर्शक संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी सामनाच्या ऑफिसमध्ये ही स्क्रिप लिहिली आहे. 100 कोटींचा आरोप होता, तो त्यांनी 500 कोटींचा केला. कारण 100 कोटींचा आरोप आला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की, फार काही मीडिया हा विषय उचलणार नाही. त्यामुळे 500 कोटी करण्याची लाइन त्यांनी धरली. या संपूर्ण क्लिपचा क्रिएटर संजय राऊत आहेत, हा आमचा स्पष्ट आरोप आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनाही विनंती करणार आहोत की, क्लिपची चौकशी करताना जी SIT नेमली जाईल. त्यामध्ये संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत कशाप्रकारे स्वप्न विकतोय ही चौकशी राज्याच्या SIT ने कराला पाहिजे.