आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला तीन वेळा गोल्ड मेडल मिळवून देणारा खेळाडू नीरज यादवचा मंगळवारी रात्री फ्लॅटमध्ये मृत आढळून आल्याने खळबळ माजली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार नीरजने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. बुधवारी दिल्लीतील एका रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. भारतीय पॅरा - अॅथलेटिक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
STORY | Top para athlete Neeraj Yadav dies by suicide Asian Para Games gold medallist Neeraj Yadav has allegedly died by suicide after consuming poison at his residence, with a postmortem examination underway at a Delhi hospital on Wednesday. S Satyanarayana, head coach of the Indian para-athletics team, confirmed the incident, saying he had learnt of the tragedy but that Yadav's body was still at the hospital. READ: https://t.co/Ye3jUCu4rh
— Press Trust of India (@PTI_News) October 28, 2026
या दुदैवी आणि धक्कादायक बातमी समजताच पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि पॅरा-ॲथलीट विपिन कसाना रुग्णालयात पोहोचले आहेत. कोच सत्यनारायण यांनी या घटनेबद्दल सांगितलं की, नीरजने मंगळवारी रात्री स्वतःच्या फ्लॅटवर विष प्राशन करुन जीवन संपवलं आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून त्याच्या आत्महत्येमागचे अचूक कारण अजून स्पष्ट झालेले नाही. तरी पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. नीरज यादव यांचा मृतदेह अद्याप रुग्णालयातच आहे.
कोचने पुढे सांगितलं की, आयची-नागोया आशियाई पॅरा गेम्समधून डोपिंग बंदीमुळे त्याला बाहेर पडावे लागले होते. या घटनेमुळे नीरज अत्यंत निराश आणि मानसिक तणावाखाली होता. याच कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.
नीरज यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. भारताच्या अत्यंत यशस्वी आणि गुणवान पॅरा-ॲथलीट्सपैकी एक खेळाडू होता. वयाच्या 7 व्या वर्षी त्याला पोलिओचा त्रासामुळे अपंगत्व आलं. खेळाची आवड असल्याने 2005 ते 2012 या काळात व्हीलचेअर टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानंतर त्याने पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सहभाग घेऊन भारताचे नाव रोशन केलं.