• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /भाजपा आतापर्यंत खासदार, आमदार, राजकीय पक्ष, निवडणुका विकत घेत होता, पण आता...; राऊतांचं थेट अमित शाहांना पत्र, 'शिंदे आणि सुपूत्र 500 कोटी...'

भाजपा आतापर्यंत खासदार, आमदार, राजकीय पक्ष, निवडणुका विकत घेत होता, पण आता...; राऊतांचं थेट अमित शाहांना पत्र, 'शिंदे आणि सुपूत्र 500 कोटी...'

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित 500 कोटींच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र सक्तवसुली संचलनालयामार्फत (ED) लिहून चौकशीची मागणी केली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 26, 2026, 10:04 AM IST|Updated: Oct 26, 2026, 10:11 AM IST
joinshare
भाजपा आतापर्यंत खासदार, आमदार, राजकीय पक्ष, निवडणुका विकत घेत होता, पण आता...; राऊतांचं थेट अमित शाहांना पत्र, 'शिंदे आणि सुपूत्र 500 कोटी...'
Image Credit: 500 कोटींच्या आरोपांची चौकशी करा; संजय राऊतांचं थेट अमित शाहांना पत्र

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित 500 कोटींच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र सक्तवसुली संचलनालयामार्फत (ED) लिहून चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी एक्सवर हे पत्र शेअर केलं आहे. "महाराष्ट्रातील 500 कोटी रुपयांचे प्रकरण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले असेल. आतापर्यंत भाजप खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेत होता; आता त्यांनी आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली आहे," असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपने श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये दिले. हे पैसे कुठून आले? आणि ते खरोखर जरांगे यांच्यापर्यंत पोहोचले की नाही? हे प्रकरण 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट' (PMLA) अंतर्गत येते. कृपया या प्रकरणाचा तपास 'सक्तवसुली संचलनालया'कडे (ED) सोपवावा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं आहे वाचा -

"तुम्हाला हे ठाऊकच असेल की, 20 ऑक्टोबर 2026 रोजी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत धक्कादायक आरोप केले आणि काही खुलासे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या कोअर टीममधील वरिष्ठ नेत्यांकडून 500 कोटी रुपये घेतले होते. ही रक्कम एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना दिली जाणार होती, परंतु ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. जरांगे पाटील यांच्या खुलाशांनुसार, 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांना शांत करण्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले त्यांचे आंदोलन थांबवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला गेला होता," असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

"मनोज जरांगे पाटील यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केलेले हे खुलासे अनेक दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. मात्र, यात सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब 500 कोटी रुपयांच्या अवाढव्य रकमेचा झालेला समावेश आहे. कोणी कोणाला 500 कोटी रुपये दिले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जर ही रक्कम जरांगे पाटलांपर्यंत पोहोचली नसेल, तर ती कुठे गायब झाली? इतकी मोठी रक्कम कुठून आली आणि ती कुठे गेली? हे प्रकरण 'मनी लाँड्रिंग'चे एक स्पष्ट उदाहरण असल्याचे दिसते, त्यामुळे त्या दृष्टीनेच याची चौकशी व्हायला हवी," अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी मी आपणास विनंती करतो की, महाराष्ट्र पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांना या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश द्यावेत; जेणेकरून सत्य परिस्थिती महाराष्ट्र आणि देशातील जनतेसमोर येईल आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना अटक केली जाईल असंही ते म्हणाले आहेत.

 

Respected Shri @AmitShah ji The ₹500 crore matter in Maharashtra must have surely reached you by now. Until now, the BJP has been buying MPs, MLAs, political parties and elections. Now it has begun buying agitations as well. The BJP handed over money to Shrikant Shinde so that ₹500 crore could be given to Manoj Jarange Patil. Where did this money come from? And did it actually reach Jarange or not? This is a matter under the Prevention of Money Laundering Act (PMLA). Kindly entrust the investigation to the Enforcement Directorate (ED). @Dev_Fadnavis @PMOIndia @BJP4India @RSSorg

— Sanjay Raut (@rautsanjay61) October 26, 2026

 

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "तुमच्या नेतृत्वाखाली, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) भारतातील 'मनी लाँड्रिंग' प्रकरणांच्या तपासात आघाडी घेतली आहे. अगदी कमी रकमेच्या प्रकरणांचाही तपास करण्याबाबत ईडीची एक ओळख निर्माण झाली आहे. आठवत असेल तर, मार्च 2021 मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी असा आरोप केला होता की, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करून देण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांचा हा केवळ एक आरोप होता, ज्याला कोणताही पुरावा नव्हता; तरीही, ईडीने अत्यंत तत्परतेने यात हस्तक्षेप केला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटकही केली. या तुलनेत, मनोज जरांगे पाटील यांनी केलेले खुलासे अधिक गंभीर आहेत, कारण त्यांनी ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात स्पष्ट आणि नाकारता न येणारे पुरावे दिले आहेत, शिवाय ही रक्कमही अत्यंत मोठी आहे".

"हे सर्व लक्षात घेता, मी आपणास आग्रहाची विनंती करतो की, महाराष्ट्र पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. याद्वारे हे शोधून काढावे की, भाजपमधील कोणत्या व्यक्तीने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिले होते? आणि ही रक्कम मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यास, ती नक्की कुठे गेली? ऑडिओ क्लिपवरून हे स्पष्ट होते की, या मोठ्या घोटाळ्यात भाजपचे वरिष्ठ नेते, त्यांची मुख्य टीम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सहभाग आहे," असा आरोप त्यांनी केला.

मला खात्री आहे की, इतकी मोठी रक्कम नेमकी कुठे गेली, हे जाणून घेण्यास तुम्हालाही उत्सुकता असेल. आरोपांचे गांभीर्य पाहता, या रकमेचा उगम शोधून काढणे आवश्यक आहे आणि या प्रचंड मनी लाँड्रिंग घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Eknath Shinde
Sanjay Raut
Amit Shah
Manoj Jarange-Patil