• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर रामदास कदम स्पष्टच बोलले; 'चौकशी झाली पाहिजे, आज एकनाथ शिंदे....'

जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर रामदास कदम स्पष्टच बोलले; 'चौकशी झाली पाहिजे, आज एकनाथ शिंदे....'

एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा आरोप केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुराव्यादाखल ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. तीन वर्षांपासून माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 22, 2026, 01:43 PM IST|Updated: Oct 22, 2026, 01:57 PM IST
joinshare
जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर रामदास कदम स्पष्टच बोलले; 'चौकशी झाली पाहिजे, आज एकनाथ शिंदे....'
Image Credit: जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर रामदास कदमांची चौकशीची मागणी

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा आरोप केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुराव्यादाखल ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि ते मला श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून दिले असं भाजपा नेत्यांना सांगितल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला होता. यानंतर रामदास कदमांनी त्यांना बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल असं आव्हान देत पुरावे समोर आणण्यास सांगितलं होतं. यानंतर मनोज जरागेंनी आज ऑडिओ क्लिप सादर केली आहे. तीन वर्षांपासून माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

"आपल्यावर तीन वर्षांपासून आरोप होत आहे. आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तीन वर्षांपासून माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं जात आहे. मराठ्यांच आंदोलन त्रास देऊन बंद पाडण्याचा प्रयत्न आहे. हे षड्यंत्र किती मोठ्या स्वरूपाच आहे हे आता उघड होणार आहे. हा त्रास किती भयंकर आहे हे मी जनतेसमोर ठेवणार आहे. गरिबाने काम करणे किती अवघड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. माझ्यासोबत शत्रुसारखे का वागायला लागलेत, हे तुमच्या लक्षात येईल. शिंदे म्हणाले मी पैसे घेतले नाही आणि दिलेही नाही, मग षड्यंत्र का रचलं जात आहे याचा शोध पंतप्रधान मुख्यमंत्री आणि दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी घ्यावा," असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा - 'जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये श्रीकांत शिंदे के...'; जरांगेंनी ऐकवली खळबळजनक ऑडिओ क्लिप; थेट भाजपाचं नाव घेतलं

मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर रामदास कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप दोन वर्ष जुनी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. "मनोज जरांगे पाटील साहेब आज तुम्ही जी क्लिप ऐकवली ती 14/10/2024 ची आहे. तुम्ही ही क्लिप दोन वर्ष का ठेवली? आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, मराठा समाजाला न्याय देण्यात त्यांचं योगदान आहे. विनोद पाटील यांना विचारून घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा कायदेशीर अभ्यासाबाबत चर्चा कोणाच्या बंगल्यावर झाल्या. आज जी क्लिप आली ती भाजपचेच लोक आहेत. उद्या कोणीही बोलु शकतो हजारो कोटी दिले. दोन अडीच वर्ष का थांबला होतात?," अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे.

"जरांगे तुम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजुला उभे राहीले पाहिजे. तुम्ही तुमच्या गुप्त बैठकीत बोललात या बैठकीत एकनाथ शिंदे यांचे चमचे बसले आहेत, त्यावेळी इंगळे बोलले की योग्य नाही त्या बैठकीत भाजपचा आमदार होता. आम्ही आता असं म्हणायचं का आमचा मराठा समाजाचा नेताच मराठा नेत्याला संपवतो आहे. आपण समाजात फूट पडेल असं वागू नये. 
चमचे बसले असं बोलल्यामुळे मला वाईट वाटलं," असं ते म्हणाले आहेत.

"आज तुम्ही एकनाथजी बोललात , देवेंद्रजी बोलतात त्यामुळे मला मनापासुन बरं वाटलं. माझी मागणी आहे की, या क्लिपची चौकशी झाली पाहिजे. ही महिला कोण आहे हे पुढे आलं पाहिजे.  आज मी लेखी तक्रार करणार आहे. मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. ही क्लिप एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच होती का? या क्लिपची चौकशी झाली तर सगळ्या गोष्टी पुढे येतील. तुमच्याकडे असलेल्या क्लिप असतील तर लवकर बाहेर काढा. जरांगे तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे तुम्ही विश्वासघात करू नये," असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Manoj Jarange-Patil
Eknath Shinde