• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मनोज जरांगेंचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला अन् श्रीकांत शिंदे..., शिंदेंच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री फडणवीसांना काय सांगितलं?

मनोज जरांगेंचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला अन् श्रीकांत शिंदे..., शिंदेंच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री फडणवीसांना काय सांगितलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या एक विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला. 500 कोटींचा ऑडिओ बॉम्बमुळे शिंदेंच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 22, 2026, 10:41 PM IST|Updated: Oct 22, 2026, 10:48 PM IST
joinshare
मनोज जरांगेंचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला अन् श्रीकांत शिंदे..., शिंदेंच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री फडणवीसांना काय सांगितलं?
Image Credit: ₹500 Crore Audio Controversy

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करणारे मनोज जरांगे पाटील आता त्यांच्यावरच तुटून पडलेत. 500 कोटींच्या कथित व्यवहाराचा आरोप करत जरांगेंनी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवलीय. तर या आरोपांना धार देण्यासाठी मनोज जरांगेंनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला आहे. ही क्लिप विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगमधील असल्याचा दावा केला जातोय. क्लिपमधील संवादाच्या आधारेच आपण आर्थिक व्यवहाराबाबत भाष्य केल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

मनोज जरांगेंनी थेट पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय. 500 कोटी रुपये दिल्याचं सांगणाऱ्यांना शिंदेंनी जाब विचारावा अशी मागणीही त्यांनी केलीय. या ऑडिओ बॉम्बेनंतर कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर महायुतीत हालचाली वाढल्या आहे. शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळात विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे आणि माजी मंत्री डॉ. दिपक सावंत हे होते.

शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्‍यांना काय सांगितलं?

कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार


शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला  पोहोचले

* राहुल शेवाळे, मिलिंद देवरा, रविन्द्र वायकर आणि उपसभापती सचिन अहिर यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला

* मनोज जरांगे यांनी व्हायरल केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा.

* या कथित व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे करणार.

* कथित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही शिष्टमंडळाकडून केली जाण्याची शक्यता. * राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया
* डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत एका महिलेने ऑडिओमध्ये केलेल्या विधानाची चौकशी करण्यात यावी 
* हे आरोप राजकीय हेतूने करण्यात आले आहेत का, याचीही चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


* डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत एका महिलेने ऑडिओमध्ये केलेल्या विधानाची तातडीने चौकशी करावी.

या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी

आरोप राजकीय हेतूने करण्यात आले आहेत का, याचीही सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.


सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
* मनोज जरांगे यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे आमच्या नेत्यांवर नाहक आरोप केले आहेत.
* या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Manoj Jarange-Patil
Eknath Shinde
Devendra Fadnavis