मनोज जरांगे यांनी जारी केलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी भाजपावर एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापला जात असल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा भाजपामध्ये घेणारे कोण आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंना इशाराही दिला आहे. जर तुम्ही एकनाथ शिंदेंची सुपारी घेतली तर मराठा साथ देणार नाहीत असं ते म्हणाले आहेत.
"मनोज जरांगे सर्वांना फसवत आहेत, ते नाटकं करत आहेत. मला ऑडिओ क्लिप कशी मिळाली हे सांगण्यापेक्षा, भाजपाला हाताशी घेऊन एकनाथ शिंदेंना संपवण्याचं षडयंत्र यावर बोलावं. अनेक मंत्री, लोक तुम्हाला भेटायला आले, उपोषण सोडवायला उशाला बसले. आमचे मित्र प्रसाद लाड तर जीवाभावाचे मित्र आहेत. ते तुमच्यासोबत बसून जेवत आहेत. इतकी मैत्री झाली तुमची. गुच्छ देऊन तुमचं स्वागत करत आहेत. तुम्ही बोलताना खांद्याला खांदा लावून बसले होते," हे सांगताना रामदास कदम यांनी फोटोही दाखवले.
"मनोज जरांगे सर्वांना फसवत आहेत, ते नाटकं करत आहेत. मला ऑडिओ क्लिप कशी मिळाली हे सांगण्यापेक्षा, भाजपाला हाताशी घेऊन एकनाथ शिंदेंना संपवण्याचं षडयंत्र यावर बोलावं. अनेक मंत्री, लोक तुम्हाला भेटायला आले, उपोषण सोडवायला उशाला बसले. आमचे मित्र प्रसाद लाड तर जीवाभावाचे मित्र आहेत. ते तुमच्यासोबत बसून जेवत आहेत. इतकी मैत्री झाली तुमची. गुच्छ देऊन तुमचं स्वागत करत आहेत. तुम्ही बोलताना खांद्याला खांदा लावून बसले होते," हे सांगताना रामदास कदम यांनी फोटोही दाखवले.
"32 मिनिटं कॉन्फरन्समध्ये चर्चा केली त्यात भाजपाला कसं वाढवायचं, मनोज जरांगेंबद्दल काय केलं पाहिजे हे सगळं क्लिपमध्ये आलं आहे. त्याची वेळही समोर आली आहे. जरांगे तुम्ही अजून जमिनीवर आहात. तुम्ही मराठा समाजाला शेंड्या लावत आहात, जातीत भिंती पाडत असून, कारण तुम्हाला स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. समाजला आता तुमच्याबद्दल समजलं असल्याने उघडे पडले आहात," असा घणाघात त्यांनी केला. यावेळी त्यांनी खोकल्याच्या औषधाचा फोटो दाखवत, मला बोलायला लावू नका असा इशारा दिला.
"ज्या दिवशी तुम्ही एकनाथ शिंदेंच्या मुळावर उठायचा प्रयत्न केला, त्या दिवशी सगळा मराठा समाज तुमच्या मुळावर आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं खरं रुप आता समोर आलं आहे. आधी तुमच्याकडे ही क्लिप कधी आली ते सांगा ना. मी कधीच हवेत बोलत नाही. ही क्लिप मला तुमच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र भांडणार एक मावळा त्याने दिली आहे. तुम्ही आव्हान दिलं तर त्याचं नावही देतो. तुम्ही आता जगाचे मालक असल्यासारखे वागत आहात. माझ्या नादाला लागू नका. मी पुराव्याशिवाय बोलत नाही," असं ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "त्या क्लिपमध्ये भाजपाचा प्लॅनिंग कसं चालतं. पैसे परस्पर द्यायचे सांगितलं आहे. प्रवीण दरेकरांचंही नाव आलं असून, त्यांना यासाठी जोडून दिल्याचं सांगितलं आहे. याचं उत्तर भाजपालाही द्यावं लागेल. विश्वासाने एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आले असताना आता तुम्हालाही त्यांची भीती वाटू लागली आहे का? एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचं काम भाजपाकडून होतंय का असा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे. म्हणून त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी अशा क्लिप काढून कटकारस्थान कोण करत आहे याचं उत्तर मिळालं पाहिजे. मी स्वत: पंतप्रधानांना, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. हे आस्तीनचे साप कोण आहेत हे कळलं पाहिजे. एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा घेणारे भाजपातील कोण आहेत हे समजलं पाहिजे".
मनोज जरांगेंना इशारा देताना त्यांनी म्हटलं की, "जरांगे सावध राहा, एकनाथ शिंदेंच्या मुळावर उठू नका. एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी सुपारी घेतल्यास मराठा साथ देणार नाहीत. हेच पाप पुन्हा करत असाल तर आम्हीही शांत बसणार नाही असा इशारा देत आहे. बदनामीच्या भीतीने आम्ही घाबरत नाही. तुझ्यासारखी सुपारी घेऊन पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. माझ्या मुलाला गृहराज्यमंत्रीपद दिलं, म्हणून त्याच्यावर उठला आहे. आम्ही गांडू लोक नाही, आम्ही पण मराठे आहोत".