मनोज जरांगे यांनी 500 कोटींची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर यावरुन महायुतीमध्येच संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे. ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या संवादामुळे शिवसेना आणि भाजपात ठिगणी पडली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपावर थेट आरोप केला असून, एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा घेणारे भाजपातील कोण आहेत? अशी विचारणा केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांचे एकत्र फोटो दाखवत काही प्रश्नही विचारले आहेत. यानंतर प्रसाद लाड यांनी त्यांना उत्तर देताना, संजय राऊत होण्याचा प्रयत्न करु नका असा टोला लगावला आहे.
"माझा एक फोटो नसून, 500 हून अधिक फोटो असतील. जरांगेंसोबत झालेली माझी प्रत्येक बैठक मीडियासमोर झाली. जो फोटो त्यांनी दाखवला त्यात शंभूराजे देसाई, विखे पाटील, उदय सामंत सर्व नेतेमंडळी आहेत. रामदास कदम यांना आम्ही भाई म्हणतो, ते आमच्या वडिलांसारखे आहेत. पण त्यांनी संजय राऊत होण्याचा प्रयत्न करु नये ही माझी विनंती आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी झी 24 तासशी संवाद साधताना दिली.
पुढे ते म्हणाले, "आम्ही कोणतंही काम घाबरुन आणि मागे लपून करत नाही, छातीवर वार करुन करतो. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी बोललं तर त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही केलं आहे. कालही शिवसेनेचे जे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं त्यात भाजपाकडून प्रामुख्याने मी नेतृत्व केलं. मुख्यमंत्र्यांनी क्लिपमधील सत्यता पडताळली जाईल, फॉरेन्सिक चौकशी केली जाईल आणि सायबरकडे दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे. क्लिप कोणी आणली याचाही आढावा घेऊन, चौकशी करु सांगितलं आहे. माहिती कमी असेल तर उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बोलले असते तर बरे झाले असते".
"टीआरपी वाढवण्यासाठी बोलण्यापेक्षा जर पक्ष संघटना मजबूत करुन महायुती मजबूत ठेवायची असेल तर मुख्यंमत्री, उपमुख्यमत्र्यांशी चर्चा केली असतं तर बरं झालं असतं. उदय सामंत यांच्याशी बोलायल हवं होतं. शिंदे महायुतीचे आणि आमचेही नेते आहेत. त्यांच्याविरोधात काही होत असेल तर आम्हीही विरोध करु. दुधात मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांनी करु नये," असं ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "त्या क्लिपमध्ये भाजपाचा प्लॅनिंग कसं चालतं. पैसे परस्पर द्यायचे सांगितलं आहे. प्रवीण दरेकरांचंही नाव आलं असून, त्यांना यासाठी जोडून दिल्याचं सांगितलं आहे. याचं उत्तर भाजपालाही द्यावं लागेल. विश्वासाने एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आले असताना आता तुम्हालाही त्यांची भीती वाटू लागली आहे का? एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचं काम भाजपाकडून होतंय का असा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे. म्हणून त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी अशा क्लिप काढून कटकारस्थान कोण करत आहे याचं उत्तर मिळालं पाहिजे. मी स्वत: पंतप्रधानांना, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. हे आस्तीनचे साप कोण आहेत हे कळलं पाहिजे. एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा घेणारे भाजपातील कोण आहेत हे समजलं पाहिजे".
"मनोज जरांगे सर्वांना फसवत आहेत, ते नाटकं करत आहेत. मला ऑडिओ क्लिप कशी मिळाली हे सांगण्यापेक्षा, भाजपाला हाताशी घेऊन एकनाथ शिंदेंना संपवण्याचं षडयंत्र यावर बोलावं. अनेक मंत्री, लोक तुम्हाला भेटायला आले, उपोषण सोडवायला उशाला बसले. आमचे मित्र प्रसाद लाड तर जीवाभावाचे मित्र आहेत. ते तुमच्यासोबत बसून जेवत आहेत. इतकी मैत्री झाली तुमची. गुच्छ देऊन तुमचं स्वागत करत आहेत. तुम्ही बोलताना खांद्याला खांदा लावून बसले होते," हे सांगताना रामदास कदम यांनी फोटोही दाखवले.
"मनोज जरांगे सर्वांना फसवत आहेत, ते नाटकं करत आहेत. मला ऑडिओ क्लिप कशी मिळाली हे सांगण्यापेक्षा, भाजपाला हाताशी घेऊन एकनाथ शिंदेंना संपवण्याचं षडयंत्र यावर बोलावं. अनेक मंत्री, लोक तुम्हाला भेटायला आले, उपोषण सोडवायला उशाला बसले. आमचे मित्र प्रसाद लाड तर जीवाभावाचे मित्र आहेत. ते तुमच्यासोबत बसून जेवत आहेत. इतकी मैत्री झाली तुमची. गुच्छ देऊन तुमचं स्वागत करत आहेत. तुम्ही बोलताना खांद्याला खांदा लावून बसले होते," हे सांगताना रामदास कदम यांनी फोटोही दाखवले.