• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /भाजपाकडून 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मराठा समाजाचं काम करा, राजकीय...'

भाजपाकडून 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मराठा समाजाचं काम करा, राजकीय...'

एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि ते मला दिले अशी माहिती भाजपा नेत्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 21, 2026, 04:49 PM IST|Updated: Oct 21, 2026, 05:05 PM IST
joinshare
भाजपाकडून 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मराठा समाजाचं काम करा, राजकीय...'
Image Credit: 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि ते मला दिले अशी माहिती भाजपा नेत्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर खळबळ उडाली असून, दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी त्यांच्यावर बोचरी टीका करत जाहीर इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.

"मनोज जरांगेंच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते बोलत आहेत. कोणालाही 500 कोटी दिले नाही आणि घेतलेही नाही. त्यामुळे ज्या आधारावर ते बोलत असतील, त्याची शहानिशा आधी करायला हवी होती आणि नंतर बोलायला हवं होतं. त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी संबंधित यंत्रणांकडे द्यायला हवेत," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

'जरांगेंनी मराठा समाजाचं काम करावं, राजकीय मंच बनवू नये'

पुढे त्यांनी म्हटलं की, "मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हेडलाइनसाठी अनेक जण माझं नाव घेतात. मनोज जरांगे मराठा समाजाचं काम करत आहेत. तेच काम त्यांनी केलं पाहिजे. ते मराठा समाजाचं काम करत होते म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना समाजाला न्याय देण्याचं काम केलं. कुणबी प्रमाणपत्र, ओबीसी आऱक्षण, 5300 लोकांना नोकऱ्या असतील..अनेक योजना ज्या मागील 60 वर्षात मराठा समाजाचे नेते जे राज्यकर्ते होते ते करु शकले नाहीत ते मी मुख्यमंत्री असताना मी केलं. देवेंद्र फडणवीसांनीही मुख्यमंत्री असताना काम केलं. आजही ते आरक्षण टिकून आहे. कोणाचंही आरक्षण कमी न करता, काढून न घेता फक्त मराठा समाजाल न्याय देण्यासाठी आम्ही काम केलं. मराठा समाजाचेच काम मनोज जरांगे करत होते, म्हणून त्यांना मदत केली. त्यांनी मराठा समाजाचं काम करावं, त्यांनी राजकीय मंच बनवू नये".

 

Eknath Shinde Live |📍दिल्ली पत्रकारांशी संवाद - लाईव्ह https://t.co/BCjfPfJHat

— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 21, 2026

 

संजय राऊतांनी अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई असल्याची टीका केल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावर आरोप केले की आपण माध्यमात चर्चेला येतो. त्यांच्याकडे गर्दीही नाही आणि माणसंही नाही. यामुळे बेछुट आरोप केले जात आहेत. ज्यांनी देशाला पुढे नेलं, 370 कलम हटवलं त्यांना रोज शिव्या घालता. ही काय तुमची पातळी आहे का? यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे".

हे ही वाचा - शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?

"तुम्ही सरकार बदलणारे कोण? हे जनता ठरवते की कोणाला सत्तेत बसवायचं आणि उतरवायचं. जनतेने तुम्हाला तीनदा उखडून फेकलं आहे. तुमच्या पक्षातील आधी सांभाळा. सत्ता परिवर्तन दूर राहिलं. त्यासाठी कामं करावी लागतात. घरात बसून कामं करावी लागतात. मासा जसा पाण्याशिवाय तडफडतो तसे ते सत्तेशिवाय तडफडत आहेत. यामुळेच देशात अराजकता पसरवली जात आहे. हा नेपाळ, श्रीलंका, नाही तर हिंदुस्तान आहे. सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढणाऱ्यांचाही खरा चेहरा समोर आला आहे. संविधान हातात घेता आणि तोडमोड करता. हे देश जोडालानाही तर तोडायला निघाले आहेत," अशी टीका त्यांनी केली आहे.

मनोज जरांगेंचा आरोप काय?

"मी टीका किंवा बदनामी करत नसून, फक्त एकनाथ शिंदे यांच्यकडून उत्तर मागत आहे. आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत याचं उत्तर त्यांनी द्यावं. एकनाथ शिंदे तुम्ही भाजपाच्या लोकांना असं सांगितलं आहे का, की मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत. तुम्ही भाजपाकडून 500 कोटी घेऊन  मला दिले आहेत असं भाजपाच्या नेत्याला सांगितलं का? कारण ते नेते कुजबुज करु लागले आहेत की, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदेंच्या हातून 500 कोटी पोहोचले आहेत. जरांगे पाटील आपले थर्ड पर्सन आहेत असं तुम्ही भाजपाला सांगितलं का? तुम्ही जर मला 500 कोटी दिले नसतील तर भाजपा नेमकं तुम्हाला संपवत आहे की तुमही मला याचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

हे ही वाचा - जरांगे पाटील बेईमान आणि ह**** माणूस; शिंदेंवरील 500 कोटी आरोपांमुळे रामदास कदमांचा संताप, 'तुझी औकात काय, याद राख आमचं दैवत...'
 

'माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार'

पुढे ते म्हणाले की, "'मी सोडणार नाही. भाजपात अंतर्गत चर्चा सुरु आहे. पण मनोज जरांगे सोपा नाही. मी मुळात हात घातला आहे. चर्चा कोणाच्यात झाली याचे पुरावे द्या असं सांगितलं आहे. माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार आहे. शिंदे भाजपाला खोटं बोलले आहेत. त्यांच्याकडून 500 कोटी घेऊन मला दिले सांगितलं. मग 500 कोटी कुठे आहेत? मी 5 हजारांचा गठ्ठाही बघितलेला नाही. शिंदेजी, हे जर खोटं असेल तर दिलखुलास सांगावं. मग मी त्यांच्याकडे पाहतो. खरं असेल तर तसंही सांगावं, की माझ्या मुलाच्या हातून 500 कोटी दिले".

'भाजपा अंस सांगून तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात?'

"माझ्या मराठ्यांची तेवढी पाकिटं गेली असतील. 3 ते 4 हजार कोटींची फक्त फुलं टाकली असतील. उद्या जर प्रत्येक मराठ्याने 100 रुपये द्या असं सांगितलं तर अडीच हजार कोटी रुपये होतील. हा लहान विषय नाही. तुमचा आमचा सामना तीन महिन्यानंतर होईल. भाजपा अंस सांगून तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात? हा खूप मोठा कट आहे. पुरावा इतका मोठा आहे की, पायाखालची जमीन सरकेल," असंही ते म्हणाले आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Eknath Shinde
Manoj Jarange-Patil