• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?

शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं आहे असा दावा त्यांनी केला.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 02:42 PM IST|Updated: Oct 20, 2026, 06:02 PM IST
joinshare
शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?
Image Credit: शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं आहे असा दावा त्यांनी केला. यासंदर्भात एकनाथ शिंदेंना आज दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळापर्यंत याचं उत्तर द्यावं असंही ते म्हणाले आहेत. भाजपा एकनाथ शिंदेंना संपवायला निघाली आहे की, ते मला संपवत आहेत याचं उत्तर मिळालं पाहिजे असंही त्यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात म्हटलं आहे. आपल्याकडे पुरावा असून, तो लवकरच सादर करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

'एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले....'

"मी टीका किंवा बदनामी करत नसून, फक्त एकनाथ शिंदे यांच्यकडून उत्तर मागत आहे. आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत याचं उत्तर त्यांनी द्यावं. एकनाथ शिंदे तुम्ही भाजपाच्या लोकांना असं सांगितलं आहे का, की मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत. तुम्ही भाजपाकडून 500 कोटी घेऊन  मला दिले आहेत असं भाजपाच्या नेत्याला सांगितलं का? कारण ते नेते कुजबुज करु लागले आहेत की, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदेंच्या हातून 500 कोटी पोहोचले आहेत. जरांगे पाटील आपले थर्ड पर्सन आहेत असं तुम्ही भाजपाला सांगितलं का? तुम्ही जर मला 500 कोटी दिले नसतील तर भाजपा नेमकं तुम्हाला संपवत आहे की तुमही मला याचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

'माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार'

पुढे ते म्हणाले की, "'मी सोडणार नाही. भाजपात अंतर्गत चर्चा सुरु आहे. पण मनोज जरांगे सोपा नाही. मी मुळात हात घातला आहे. चर्चा कोणाच्यात झाली याचे पुरावे द्या असं सांगितलं आहे. माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार आहे. शिंदे भाजपाला खोटं बोलले आहेत. त्यांच्याकडून 500 कोटी घेऊन मला दिले सांगितलं. मग 500 कोटी कुठे आहेत? मी 5 हजारांचा गठ्ठाही बघितलेला नाही. शिंदेजी, हे जर खोटं असेल तर दिलखुलास सांगावं. मग मी त्यांच्याकडे पाहतो. खरं असेल तर तसंही सांगावं, की माझ्या मुलाच्या हातून 500 कोटी दिले".

'भाजपा अंस सांगून तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात?'

"माझ्या मराठ्यांची तेवढी पाकिटं गेली असतील. 3 ते 4 हजार कोटींची फक्त फुलं टाकली असतील. उद्या जर प्रत्येक मराठ्याने 100 रुपये द्या असं सांगितलं तर अडीच हजार कोटी रुपये होतील. हा लहान विषय नाही. तुमचा आमचा सामना तीन महिन्यानंतर होईल. भाजपा अंस सांगून तुम्हाला संपवत आहे की, तुम्ही मला संपवत आहात? हा खूप मोठा कट आहे. पुरावा इतका मोठा आहे की, पायाखालची जमीन सरकेल," असंही ते म्हणाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Manoj Jarange-Patil
Eknath Shinde
BJP