स्त्री बीजाची तस्करी ऐकून धक्का बसला ना! पण हे खरं आहे. आपल्या महाराष्ट्रात हा प्रकार घडला आहे. बदलापूरमध्ये हे राज्याला खळबळ उडवून देणारे रॅकेट समोर आले आहे. आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने उडी घेतली आहे. बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाची चौकशी ईडी करणार आहे.
बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणातून कमावलेल्या काळ्या पैशांचा माग काढण्यासाठी ईडीच्या एका विशेष पथकाने उल्हासनगरातील एका महिला आरोपीच्या घरावर छापा टाकत तेथे झडती घेतली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या कारवाईला अधिकृत दुजोरा दिला आहे.
कायदेशीर रित्या एका महिलेकडून एकदाच स्त्री बीज काढण्यात येते. मात्र एकाच महिलेकडून वांरवार स्त्री बीज काढणे हे बेकायदेशीर आहे. तसंच, त्या स्त्रीच्या आरोग्यासाठी धोकादायक देखील आहे. महिलेच्या शरिरातून काढण्यात आलेले या स्त्रीबीजाची विक्री 18 ते 25 हजार रुपयांना करायचे.
धक्कादायक म्हणजे, या टोळीने साधारणातः 40 हून अधिक गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून स्त्री बीज काढण्यात यायचे. तसंच, एकाच महिलेच्या शरीराची 33 वेळा प्रक्रिया स्त्री बीज काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच, या प्रकरणात आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटर, हार्मोनल इंजेक्शन पुरवणारे पुरवठादार यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ठाणे पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार सोनल गाडेकर (वय 44) हिच्यासह अश्विनी चाबुकस्वार (29) आणि मंजुषा वानखेडे (46) अशा 3 महिलांना अटक केली होती
'इडी'च्या पथकाने उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील सुभाष टेकडी परिसरातील दहा चाळ भागात सकाळी महिला आरोपीच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्या बँक खात्यांचे तपशील, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. या प्रकरणात पैशांची देवाणघेवाण हवाला किंवा अन्य कोणत्या बेकायदा माध्यमातून झाली का? याचा सखोल तपास अधिकारी करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.