• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येशी रिक्षावाल्याचंही कनेक्शन, त्या पाच जणांनी...; SIT तपासात हादरवणारा खुलासा

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येशी रिक्षावाल्याचंही कनेक्शन, त्या पाच जणांनी...; SIT तपासात हादरवणारा खुलासा

मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहरामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या धक्कादायक हत्येसंदर्भातील हादरवून टाकणारी माहिती एसआयटीच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. नेमकं काय कळालय या तपासात पाहूयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 12, 2026, 09:32 AM IST|Updated: Oct 12, 2026, 09:51 AM IST
joinshare
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येशी रिक्षावाल्याचंही कनेक्शन, त्या पाच जणांनी...; SIT तपासात हादरवणारा खुलासा
Image Credit: 29 सप्टेंबर रोजी झाली पूर्णेकरांची हत्या (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीला तपासात काही नवे धागेदोरे हाती लागले आहेत. हत्येप्रकरणी अटक केलेल्या पाचही हल्लेखोरांशी प्रदीप पूर्णेकरांचे वैर असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाटातून ताब्यात घेतलेला फरार आरोपी संतोष उर्फ टल्ली आणि अमित सिंग (रिक्षाचालक, रा. भाईंदर) यांना रविवारी एसआयटीने खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात दिले.

आरोपी खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात

दोघांनाही आज ठाणे न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. दहा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टल्ली व त्याचा साथीदार अमित यांना शुक्रवारी खंडणीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक भूषण कापडणीस आणि युनिट पाचचे सहायक शरद पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पकडले. त्यांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्यांना रविवारी सायंकाळी खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

अमली पदार्थांमुळे मारहाण

टल्लीचा काही दिवसांपूर्वी ज्याच्याशी वाद झाला त्याचे समर्थन बाळू उर्फ प्रदीप यांनी केल्याचा दावा त्याने प्राथमिक चौकशीत केला. नितेश पवार हा टल्लीचाच मित्र असल्याने तो हत्येत सहभागी झाला. तर सुभाष उर्फ पप्या शिंदेचे पालिका निवडणुकीपासूनच पूर्णकर यांच्याबरोबर वैर होते. अमली पदार्थाच्या सेवनामुळे निखिल यादवलाही प्रदीप यांनी मारहाण केल्याचा दावा आहे. भाईंदरचा रिक्षाचालक अमित सिंग हा चौघांचाही मित्र असल्याने तो या हत्येमध्ये सहभागी झाला.

अजून अनेक प्रश्न अनुत्तरित

हत्येमध्ये वापरलेली हत्यारे कुठे लपविली? आणखी कोणी साथीदार आहेत का? या हत्येमागील काही राजकीय कनेक्शन आहे का? याचाही तपास सुरू आहे. आरोपींना वाहने व हत्यारे पुरविणाऱ्या पप्या शिंदे याची या हत्याकांडातील भूमिका तपासली जात आहे.

हे प्रकरण नेमकं काय? ते पाच जण कोण?

प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा भागातील त्यांच्या कार्यालयाबाहेर काही मुखवटाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. सुरुवातीला या हत्येमागे राजकीय कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, एसआयटीच्या प्राथमिक चौकशीनुसार, प्रदीप पूर्णेकर यांचे या हत्येत सामील असलेल्या पाचही हल्लेखोरांशी वेगवेगळे जुने वैयक्तिक वैर असल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर 10 दिवस फरार असलेला मुख्य सूत्रधार संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि त्याचा साथीदार रिक्षाचालक अमित सिंग या दोघांना ठाणे गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली. संतोषनेच या सर्व आरोपींना हत्येसाठी एकत्र आणले होते. पोलिसांनी सुरुवातीलाच सुभाष उर्फ पप्या शिंदे (जो पूर्णेकर यांचा मित्र नाटक करत होता), गोळीबार करणारे नितेश पवार आणि निखिल यादव यांना अटक केली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
crime
Mumbai
Mumbai News