• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश! मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश! मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश मिळालं आहे. मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 21, 2026, 10:48 PM IST|Updated: Oct 22, 2026, 01:06 AM IST
joinshare
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश! मारेकरी टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळ...
Image Credit: Pradeep Purnekar SIT

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाला (SIT) मोठं यश मिळालं आहे. ठाणे एसआयटी पथकाने मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळील एका अज्ञात ठिकाणावरून हत्येत वापरलेले एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून जप्तीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यातील त्यांच्या ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेला 22 दिवस उलटून गेल्यानंतर आता SIT ला मोठं यश प्राप्त झालं आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अन्य पाचही आरोपींला गजाआड केलं आहे. आता पुढील तपास करताना संतोष कनोजिया उर्फ टल्ली याने महत्त्वाची आणि मोठ्या पुराव्याचा खुलासा केला. पोलिसांनी यापूर्वी या हत्याकांडात एक पिस्तूल आणि एक मोबाईल जप्त केला होता. कर्नाळा अभयारण्याजवळ महामार्गालगत एका पडक्या झोपडीच्या पाठीमागे झुडपात पिस्तूल, मोबाइल पोलिसांना सापडले आहेत. याच भागात आता पोलिसांना एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहे. चौकशीदरम्यान प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात वापरण्यात आलेल्या शस्त्राबद्दल  टल्ली याच्याकडून माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कर्नाळा परिसराजवळील एका अज्ञात ठिकाणावरून हत्येत वापरलेले एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.

हेसुद्धा वाचा -  राम पूर्णेकरांने दाखवलेल्या बंदूकवाला त्या व्हिडीओवर राजेंद्र शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पोलिसांच्या चौकशीनंतर...

ठाण्यातील गणेशनगर कार्यालयात 29 सप्टेंबर रोजी रात्री प्रदीप पूर्णेकरांची हत्या झाली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तसंच धारदार शस्त्राने वार केले होते. या  हल्ल्यात प्रदीप पूर्णेकरांचा मृत्यू झाला. विशेष तपास पथकाने सुभाष शिंदे उर्फ पप्या, निखिल यादव उर्फ शूटर, नितेश पवार उर्फ भावड्या आणि संतोष कनोजिया उर्फ टल्लीला अटक केली आहे. 2021 मध्ये उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आलेली पिस्तुले पूर्णेकर यांच्या हत्येसाठी कशी वापरली, कशी पोहोचली, त्यांचा वापर कोणी आणि कशा प्रकारे केला, याचा तपास पोलीस या मारेकऱ्यांच्या चौकशीतून शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Thane
crime