• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /₹23719 कोटींची गुंतवणूक, 32981 घरं अन् तिसऱ्या स्थानी असलेली मुंबई... पहिल्या दोन क्रमांकावरील शहरं कोणती?

₹23719 कोटींची गुंतवणूक, 32981 घरं अन् तिसऱ्या स्थानी असलेली मुंबई... पहिल्या दोन क्रमांकावरील शहरं कोणती?

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 24, 2026, 12:57 PM IST|Updated: Oct 24, 2026, 01:22 PM IST
joinshare
घरांची सर्वाधिक मागणी असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने एक मोठा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. त्याबद्दलच...

महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्राचं नियमन आणि विकासासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या महारेराने नेमका काय निर्णय घेतलाय जाणून घ्या...

real estate news1/8

विदर्भ, खानदेश अन् मराठवाड्यातील किती प्रकल्प मंजूर?

विदर्भाच्या 32 प्रकल्पांत नागपूरचे 27, अमरावतीचे चार आणि अकोल्याच्या एका प्रकल्पाचा समावेश आहे. तर खानदेशातील 24 प्रकल्पांत नाशिकचे 23, अहिल्यानगरचा एक प्रकल्प आहे. तसेच मराठवाड्यात 8 प्रकल्प मंजूर झाले असून संभाजीनगरचे सात आणि नांदेडचा एक प्रकल्प यात आहे. दादरा नगर हवेलीचे दोन आणि दमणच्या एका प्रकल्पालाही महारेराने मंजुरी दिली आहे.
real estate news2/8

सातारा, कोल्हापूर आणि सांगलीत किती प्रकल्प मंजूर?

साताऱ्यात 13, कोल्हापुरात 8 तर सांगली आणि सोलापूर प्रत्येकी तीन प्रकल्पांना महारेराकडून मंजुरी मिळाली आहे.
real estate news3/8

मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई महानगर प्रदेशाचे 201 प्रकल्प असून यात मुंबई शहर आणि उपनगर मिळून 63 प्रकल्प आहेत. मुंबईपेक्षा ठाण्यात अधिक प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून येथील मंजूर प्रकल्पांची संख्या 70 इतकी आहे. म्हणजेच पुण्याखालोखाल ठाणे आणि त्यानंतर सर्वाधिक प्रकल्प मंजूर झालेल्या शहरांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक लागतोय. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधील रायगडमधील 36, पालघरचे 25, रत्नागिरीचे पाच आणि सिंधुदुर्गचे दोन प्रकल्प महारेराकडून मंजूर झालेत.
real estate news4/8

पुणे पहिल्या क्रमांकावर; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी?

पुण्यात सर्वाधिक 140 प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि महानगर प्रदेशात एकूण 201 प्रकल्पांना हिरवा सिग्नल देण्यात आलाय. मात्र मुंबईतील प्रकल्पांची संख्या पुण्यापेक्षा अधिक वाटत असली तरी त्यात उपनगरांमधील प्रकल्पांचाही समावेश आहे.
real estate news5/8

प्रकल्पांतील सुधारणांचे प्रस्ताव मजूर

विकासकांनी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा देऊन केलेल्या विनंतीनुसार 2053 जुन्या प्रकल्पांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून २,३७७ जुन्या प्रकल्पांतील सुधारणांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत.
real estate news6/8

210 प्रकल्पांना मुदतवाढ

विकासकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार जुन्या प्रकल्पांपैकी 210 प्रकल्पांना मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पांतील सुधारणांच्या सुमारे 609 प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे. एप्रिल 26 ते सप्टेंबर 26 या 6 महिन्यांत 6 हजार 486 प्रकल्पांचे प्रस्ताव महारेराने मंजूर केले आहेत. यात 2056 नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोंदणीक्रमांक दिले आहेत.
real estate news7/8

23 हजार 719 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करता यावे यासाठी राज्यात 435 प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक देण्यात आले आहेत. हे क्रमांक दसऱ्याच्या मुहूर्तावर देण्यात आले असून या सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे 23 हजार 719 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामधून 32 हजार 981 घरांची निर्मिती होणार आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
real estate news8/8

मुंबई यादीत तिसऱ्या स्थानी, पहिली दोन शहरं कोणती?

सर्वाधिक प्रोजेक्ट मंजूर झालेल्या यादीत मुंबई महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानी आहे. पण महारेराने सर्वाधिक प्रकल्प मंजूर केलेल्या शहरांच्या यादीत मुंबईच्या वर असणारी दोन शहरं कोणती? जाणून घेऊयात...
TAGS:
Mumbai
Pune
Thane

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.