• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /'ठाण्यात घराजवळ असलेल्या पूर्णेकर कुटुंबीयांना भेटायला वेळ नाही, पण...', टायगर श्रॉफ भेटीवरुन पूर्णेकर कुटुंबाचा संताप, '19 दिवसांनीही...'

'ठाण्यात घराजवळ असलेल्या पूर्णेकर कुटुंबीयांना भेटायला वेळ नाही, पण...', टायगर श्रॉफ भेटीवरुन पूर्णेकर कुटुंबाचा संताप, '19 दिवसांनीही...'

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान यावरुन प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी नाराजी जाहीर केली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 19, 2026, 03:22 PM IST|Updated: Oct 19, 2026, 04:23 PM IST
joinshare
'ठाण्यात घराजवळ असलेल्या पूर्णेकर कुटुंबीयांना भेटायला वेळ नाही, पण...', टायगर श्रॉफ भेटीवरुन पूर्णेकर कुटुंबाचा संताप, '19 दिवसांनीही...'
Image Credit: टायगर श्रॉफ भेटीवरुन पूर्णेकर कुटुंबाचा संताप

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे इतक्या तातडीने टायगर श्रॉफला भेटीसाठी पोहोचल्याने प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी नाराजी जाहीर केली आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येला 19 दिवस उलटल्यानंतरही एकनाथ शिंदे अद्याप भेटीसाठी न आल्याने प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राम पुर्णेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "ठाण्यात एका हत्येला 19 दिवस उलटल्यानंतरही पीडित कुटुंबाची भेट न घेणारे उपमुख्यमंत्री टायगर श्रॉफची विचारपूस करायला त्यांच्या घरी तातडीने पोहचले आणि तिथे कठोर कारवाईचे आश्वासन दिले, परंतु ठाण्यातच त्यांच्या घराजवळ असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबाच्या भेटीला मात्र त्यांना वेळ नाही".

संजय राऊतांची टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. "हे शिंदे टायगरच्या घरी गेले रडायचे बाकी होते, पण पूर्णेकरांच्या ठाण्यातल्या घरी गेले नाही. हे उपमुख्यमंत्री पूर्णेकरांच्या सांत्वनासाठी गेले नाही. किंवा खरे आरोपी पकडावे यासाठी सूचना दिल्या नाहीत. प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर किती वेळ लागतो आरोपी सापडायला? ते आरोपी मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंसोबत फिरतात," अशी टीका त्यांनी केली आहे.

"मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालं आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासूनचा काळ पाहा. 90 चा काळ बघितला तर गँगवार, धमक्या, खंडणी हा काळ पुन्हा एकदा फडणवीस- शिंदे-पवार यांच्या काळात पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दीकी, पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या झाली. या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा असा आम्ही सांगतो. यांना फक्त विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायला गृह विभाग पाहिजे," अशी टीकाही त्यांनी केली.


प्रदीप पूर्णेकर कुटुंबीय गुणरत्न सदावर्तेंच्या भेटीला

प्रदीप पूर्णेकर कुटुंबीय गुणरत्न सदावर्तेंच्या भेटीला पोहोचले होते. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना भेटण्यासाठी परेल इथल्या कार्यालयात आले होते. यापूर्वी सदावर्ते यांनी प्रदीप पुर्णेकर यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनापरी भेट घेतली होती.

‘पोलिसांनी त्यावेळीच तक्रारींचे निवारण झाले असते, तर ही घटना घडली नसती’


प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धमकीचे संदेश मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनीही गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आपले बंधू भूषण भोईर यांनाही मीनाक्षी शिंदे यांनी शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांचे निवारण झाले नाही. पोलिसांनी तेव्हाच तक्रारींची दखल घेतली असती, तर आजची घटना घडली नसती, असा दावा संजय भोईर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कुटुंबातील सदस्याला ‘अगला नंबर तेरा’ असा धमकीचा संदेश मिळाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय भोईर यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केल्यानंतर कुटुंबीयांना तातडीने तीन पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे भोईर यांनी सांगितले.

पूर्णेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, त्यांच्या घरची परिस्थिती पाहता त्यांना आधार देण्याची गरज आहे. मी पहिल्या दिवसापासून या कुटुंबीयांसोबत आहे. आगरी-कोळी समाजाच्या दृष्टिकोनातूनही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करावा, असेही भोईर म्हणाले. पूर्णेकर कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसह कुटुंबीयांच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यानंतर याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री घेतील, असे संजय भोईर यांनी स्पष्ट केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोहोचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आपल्या बंधू भूषण भोईर यांनाही निवडणुकीच्या काळात शिवीगाळ आणि धमकीचा सामना करावा लागल्याचा आरोप संजय भोईर यांनी केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यावेळी केलेल्या तक्रारींवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर परिस्थिती वेगळी असती, असा दावा त्यांनी केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
Eknath Shinde
Tiger Shroff