• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /कोकणातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली; 25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला

कोकणातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली; 25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला

आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्डनी जीवदान दिले आहे. 25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 13, 2026, 04:09 PM IST|Updated: Oct 13, 2026, 04:17 PM IST
joinshare
कोकणातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली;  25 वर्षाचा तरुण सुखरुप बचावला

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील आचरा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना टळली आहे. एक तरुण पर्यटक सुखरुप बचावला आहे. आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला मरीन होमगार्डच्या जवानांनी जीवदान दिले आहे. हा पर्यटक मुंबईचा आहे.  समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना खबरदारी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. एकाधी लहानशी चूक देखील जीवावार बेतू शकते. 

 भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडू लागलेल्या मुंबई येथील 25 वर्षीय पर्यटकाला मरीन होमगार्डच्या दोन जवानांनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे वाचवले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी समुद्राच्या जोरदार प्रवाहाची पर्वा न करता तातडीने बचावकार्य करत पर्यटकाचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आचरा येथील नातेवाईकांकडे मुंबईहून आलेले एक कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील एक व्यक्ती समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरली असता, भरतीची वेळ असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

कुटुंबीयांचा आक्रोश ऐकताच मरीन होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली. पाण्याचा जोर आणि लाटांचा धोका असतानाही दोघांनी धाडसाने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी मोहम्मद खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढले. दोन्ही जवानांच्या प्रसंगावधानामुळे पर्यटकाला वेळीच मदत मिळाली आणि मोठा अनर्थ टळला.

​मालवण येथील मच्छीमार गोपी तांडेल यांची 'भगवती' नावाची नौका मासेमारीसाठी  देवगड समुद्रात गेली होती. बोटीच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. समुद्रात बोटीला आग लागल्याचे समजताच खलाशांमध्ये धावपळ उडाली. मात्र, वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे बोटीवरील सर्व 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sindhudurg
Thane
Kokan