• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा

आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा

मागील काही दिवसांपासून आर्यवीर सेहवाग हा त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. आता आर्यवीर सेहवागचे वडिल म्हणजेच भारताचे दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने मोठे विधान त्याच्या मुलासाठी केले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 20, 2026, 15:10 IST|Updated: Nov 20, 2026, 15:31 IST
joinshare
आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणींना मोठा दिलासा; मासिक पाळी आल्यास..., गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

2

'नावामुळेच मोहम्मद सिराजला संघात घेतलं नाही,' काँग्रेस खासदाराच्या विधानाने गदारोळ! भाजपाने दिलं प्रत्युत्तर

3

आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा

4

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

5

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नुकतीच अंडर 19 आशिया कप स्पर्धा पार पडली, या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करुन विजेतेपद नावावर केले. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याच्या मुलाने कमालीची कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने आशिया कपमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली त्याच्या या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले होते. मागील काही दिवसांपासून आर्यवीर सेहवाग हा त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. आता आर्यवीर सेहवागचे वडिल म्हणजेच भारताचे दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने मोठे विधान त्याच्या मुलासाठी केले आहे.

आर्यवीर सेहवागने नुकत्याच झालेल्या आशिया कप 2026 च्या स्पर्धेमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आर्यवीरच्या कामगिरीबद्दल जेव्हा वीरेंद्र सेहवागला विचारण्यात आले त्यावेळी दिग्गजाने सांगितले की, "मला खूप आनंद आहे की आर्यवीरने भारताच्या १९ वर्षांखालील आशिया कप विजयात योगदान दिले. त्याने अंतिम सामन्यात विशेषतः चांगली खेळी केली. मी आर्यवीरला नेहमी सांगायचो की, जर तुला आदर मिळवायचा असेल, तर तुला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्याने अंडर 19 आशिया कप स्पर्धेमध्ये त्याची क्षमता त्याने दाखवून दिली.

हे ही वाचा

'आम्ही देखील बाटलीची झाकणे वापरली...' सँडपेपरच्या वादादरम्यान शोएब अख्तरचा मोठा खुलासा!

आर्यवीर सेहवाग आयपीएलमध्ये प्रवेश करणार का?

वीरेंद्र सेहवाग यांना आता आपल्या मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहायचे आहे. वीरेंद्र सेहवागने नुकतीच एक मुलाखत दिली आहे यामध्ये त्याने त्याच्या मुलाच्या भविष्याबद्दल सांगितले आहे. आपल्या मुलाच्या पुढील वाटचालीबद्दल सांगताना ते एएनआयला म्हणाले, "मला अभिमान आहे की माझा मुलगा चांगला खेळला. त्याला सर्वांचे प्रेम मिळाले. मला आशा आहे की आर्यवीर आता लिलावात जाईल आणि एखादी फ्रँचायझी त्याला नक्कीच निवडेल. त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि तो या संधीसाठी पात्र आहे."

वैभव सूर्यवंशीने अंडर 19 मध्ये कमालीची कामगिरी केली आणि त्यानंतर त्याला राजस्थान रॅायल्सच्या संघामध्ये स्थान मिळाले आणि त्याचे आयुष्य बदलले. आर्यवीर सेहवागच्या अंडर 19 आशिया कप 2026 च्या स्पर्धेमधील कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर आशिया कपमध्ये आर्यवीर सेहवागला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आले. त्याने पाच डावांमध्ये 90.25 च्या सरासरीने फलंदाजीने केल्या, त्याने पाच इनिंगमध्ये 361 धावा केल्या. आर्यवीरने 95.50 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत एकूण 38 चौकार आणि 16  षटकार मारले. त्याने भारतीय संघाचा भावी खेळाडू म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याला लवकरच आयपीएलमध्ये संधी मिळू शकते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Sports News