SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

विराट कोहलीचे 5 मोटिव्हेशन कोट्स जे तुमचं आयुष्य बदलतील, फॅन्सनी तर नक्कीच वाचा

Virat Kohli 5 Inspiration Quotes : विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. अनेकजणांसाठी तो त्यांचा आदर्श आहे. तेव्हा विराटच्या 5 अशा मोटिव्हेशन कोट्सबद्दल जाणून घेऊयात जे तुमचं आयुष्य बदलू शकतात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 01, 2026, 12:02 PM IST | Updated: Oct 01, 2026, 12:43 PM IST
Join

Virat Kohli 5 Inspiration Quotes : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली फक्त फलंदाजीसाठी नाही तर त्याच्या फिटनेस, सातत्य, अनुशासनसाठी सुद्धा ओळखला जातो. त्याचा प्रवास दाखवून देतो की फक्त टॅलेंट असून चालत नाही तर खूप लांब वेळपर्यंत यश मिळवायचं असेल सातत्य आणि अनुशासन सुद्धा गरजेचं असतं. विराट कोहली आज ज्या यशाच्या शिखरावर आहे त्यामुळे अनेक चाहते त्याला फॉलो करतात आणि त्याच्या सारखं बनू इच्छितात. तेव्हा विराटच्या 10 मोटिव्हेशनल कोट्सबद्दल जाणून घेऊयात.

'टॅलेंट तुम्हाला सुरुवात करून देतं, पण शिस्तच तुम्हाला दीर्घकाळ पुढे नेत राहते' :

एखाद्या कामासाठी अंगभूत गुणवत्ता असणे ही जरी चांगली सुरुवात असली, तरी सातत्यपूर्ण सुधारणेसाठी शिस्त अत्यंत आवश्यक असते. क्रिकेट असो वा अन्य कोणतेही क्षेत्र, प्रगती ही दररोजचा सराव आणि स्वतःच्या उणिवांवर काम करण्यामुळेच साधली जाते. या गोष्टींशिवाय केवळ गुणवत्ता असूनही एखादी व्यक्ती कालांतराने मागे पडू शकते.

'दररोज स्वतःमध्ये सुधारणा करण्याची सवय हाच खऱ्या यशाचा पाया आहे' :

विराट कोहली आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. तरुणांसाठी यातून मिळणारा धडा म्हणजे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःची तुलना स्वतःशीच करावी. म्हणजेच कालच्या तुलनेत आज तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या सुधारणाच अखेरीस महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात.

'मोटिवेशन नेहमी टिकत नाही, पण शिस्त तुम्हाला अशा वेळीही काम करत राहण्याची ताकद देते' :

प्रत्येक दिवशी उत्साहाने काम करणं शक्य नसतं. कधी तुम्ही थकाल, कधी तुमचं मन करणार नाही आणि कधी परिणाम सुद्धा तुमच्या अपेक्षेनुसार नसतील. अशावेळी शिस्त ही तुम्हाला तुमच्या कामात राहण्यासाठी मदत करेल आणि हीच सवय तुम्हाला खूप लांबचं ध्येय गाठण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

'यश फक्त मोठ्या सामन्यात मिळत नाही, तर दररोज छोट्या छोट्या मेहनतीने सुद्धा मिळतं' :

खेळाडूचे यश मैदानावर दिसून येते, परंतु त्यामागे अनेक तासांचे प्रशिक्षण, सराव आणि तयारी असते. जीवनातील इतर क्षेत्रांच्या बाबतीतही हेच लागू होते. परीक्षेत चांगले गुण मिळवणे, करिअरमध्ये प्रगती करणे किंवा एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवणे या गोष्टी एका रात्रीत साध्य होत नाहीत.

'आपल्या टार्गेटवर लक्ष केंद्रित करा आणि त्या गोष्टींपासून दर राहा जे तुमचं लक्ष विचलित करतात' :

सोशल मीडिया आणि सतत विचलित करणाऱ्या गोष्टींनी भरलेल्या आजच्या जगात, एकाग्रता टिकवून ठेवणे सोपे नाही. विराटचे उदाहरण आपल्याला शिकवते की, एखादे ध्येय महत्त्वाचे असेल, तर त्यासाठी आवश्यक वेळ देणे आणि योग्य प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचं असतं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES