SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹30 हजार कोटींची गुंतवणूक... राज्यात उभारणार 500 मेगावॉटचे डेटा सेंटर; राज्य सरकारचा 'या' कंपनीशी झाला करार

आगामी काळात एआय, मोठ्या प्रमाणातील डेटा प्रक्रिया आणि उच्च कार्यक्षम संगणकीय तंत्रज्ञानाची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्रात 500 मेगावॉट क्षमतेचा ग्रीन इंटिग्रेटेड हायपरस्केल डेटा सेंटर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 07, 2026, 01:57 PM IST | Updated: Oct 07, 2026, 02:09 PM IST
Join

एआय, मोठ्या प्रमाणातील डेटा प्रक्रिया आणि उच्च कार्यक्षम संगणकीय तंत्रज्ञानाची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्रात 500 मेगावॉट क्षमतेचा ग्रीन इंटिग्रेटेड हायपरस्केल डेटा सेंटर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ट्रेंटर प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्र सरकारसोबत 30  हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे.

'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत झालेल्या या कराराचे औपचारिक हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे डॉर्फ केटल समूहाचा डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश होणार आहे. प्रस्तावित डेटा सेंटरमध्ये कृत्रिम प्रज्ञा, क्लाऊड, उच्च कार्यक्षम संगणकीय प्रणाली आणि मोठ्या प्रमाणातील डेटा आधारित अनुप्रयोगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, परवाने आणि लागू सवलती मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून समन्वय करण्यात येणार आहे.

प्रकल्पाला लागू असलेल्या शासकीय सहाय्य आणि प्रोत्साहनांचा तपशील असलेले इरादा पत्रही राज्य सरकारने दिले आहे. या प्रस्तावित प्रकल्पात शाश्वत ऊर्जेला प्राधान्य ट्रेंटरचा सरकारशी 30 हजार कोटींचा सामंजस्य करार कृत्रिम प्रज्ञेसाठी मोठी सुविधा बिग डेटा विश्लेषण, डेटा प्रक्रिया, उच्च कार्यक्षम संगणकीय प्रणाली तसेच कृत्रिम प्रज्ञा आणि यंत्र अध्ययन यांची मागणी वाढत आहे.

प्रस्तावित डेटा सेंटरमुळे अशा तंत्रज्ञानाधारित अनुप्रयोगांसाठी विस्तारक्षम डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. अधिक सुरक्षित, सक्षम आणि लवचिक डिजिटल पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यास या प्रकल्पाची मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES