SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमरावती हादरली! 20 लाखांच पॅकेज, वर्क फ्रॉम होम, IT इंजिनिअरने त्या एका कारणामुळे आईला संपवलं

अमरावतीमध्ये एका लेकाने आपल्या आईची हत्या केली आहे. आयटी इंजिनिअर असलेल्या मुलाने असं कृत्य का केले याच कारण समजल्याने शहरात खळबळ माजली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 12, 2026, 09:33 PM IST | Updated: Oct 12, 2026, 09:35 PM IST
Image Credit: 20 लाखांच पॅकेज, वर्क फ्रॉम होम
Join

अमरावतीमधील गजानन प्लाझा अपार्टमेंटमधील एका लेकाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हत्येसंदर्भात पोलिसांनी मुलगा तुषार सतीश कानफाडे याला अटक केली आहे. 39 वर्षीय तुषार हा एका विदेशी कंपनीमध्ये वर्षाला 20 लाखांच्या पॅकेजवर काम करायचा. आयटी क्षेत्रातील नोकरी आणि वर्क फ्रॉम होम असं सगळं असतानाही त्याने असं कृत्य का केलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या ही धक्कादायक घटना घडली. 65 वर्षीय रंजना सतीश कानफाडे यांची मुलगा तुषारने गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर तुषारने स्वत:हून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.

तुषारने पोलिसांना सांगितलं की, आई नेहमी खोटं बोलत असल्यामुळे आपण अडचणीत आलो होतो. याच कारणामुळे मी आईची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी तुषारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती काढली तेव्हा समजलं की, काही वर्षांपूर्वी त्याच एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. पण तुषारच्या संशयी स्वभावामुळे हे लग्न मोडलं होतं. घटनेच्या दिवशीही आईसोबत किरकोळ वादातून आई आणि मुलगा तुषार यांच्यामध्ये वाद झाले होते. ज्यावेळी तुषारने आईचा गळा दाबत होता, तेव्हा मी तुझी आई आहे, असं वारंवार विनवणी करत होती, असं खुद्द तुषारने सांगितलं. पण रागाच्या भरात तो काय करतोय, याचा तिला भानच राहिलं नाही.

एवढंच नाहीतर आईच्या हत्या केल्यानंतर तुषार बराच वेळी आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. नंतर तो स्वत:हून  गाडगे नगर पोलीस ठाण्यामध्ये आला आणि त्याने झालेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान आई आणि मुलामध्ये नेमका कशावरून वाद झाला होता, हे मात्र अजून त्याने सांगितलेले नाहीय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES