बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनसची रक्कम आणि तारीखही ठरली; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा!
बेस्टच्या २२,६५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना यंदा ३३ हजार रुपयांचे दिवाळी सानुग्रह अनुदान मिळणार असून, 3 नोव्हेंबर रोजी रक्कम खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची आनंदाची बातमी आहे. बेस्टच्या 22 हजार 654 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी 33 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकूण सुमारे 75 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी काय आहे गुड न्यूज? सविस्तर जाणून घेऊया.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस
बेस्ट उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 33 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी या निर्णयाची घोषणा केली. एकूण 22 हजार 654 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या सर्वांसाठी सुमारे 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
गेल्या वर्षीपेक्षा दोन हजार रुपयांची वाढ
यंदाच्या बोनसमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 31 हजार रुपये देण्यात आले होते. यंदा ही रक्कम वाढवून 33 हजार रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला गेल्या वर्षीपेक्षा दोन हजार रुपये अधिक मिळणार आहेत. सणासुदीच्या काळात घरखर्च, खरेदी आणि इतर आर्थिक गरजांसाठी ही वाढ उपयोगी ठरू शकते.
बोनस थेट बँक खात्यात कधी?
3 नोव्हेंबर 2026 रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही.
बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी 75 कोटींचे अनुदान
22 हजार 654 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 33 हजार रुपये दिल्यास एकूण रक्कम सुमारे 74.76 कोटी रुपये होते.बेस्ट उपक्रम आर्थिक आणि प्रशासकीय आव्हानांना सामोरे जात असताना कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.
प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.