SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बुलढाण्यातील सरपंचपुत्राचा दुर्दैवी मृत्यू, विहिरजवळ निसटलेला पाईप दुरुस्त करायला गेला अन्, धरणातच...

पाणीपुरवठा योजनेच्या विहिरजवळ निसटलेला पाईप जोडण्यासाठी धरणात उतरला. मसरूळच्या सरपंच पुत्राचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 15:06 IST | Updated: Nov 22, 2026, 15:08 IST
Image Credit: buldhana news Son of Masrul Sarpanch dies after drowning in a dam
Join

बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे धरणाच्या पाण्यात बुडून 48 वर्षीय मधुकर महाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मधुकर महाले हे मासरूळच्या विद्यमान सरपंच शकुंतलाबाई महाले यांचे पुत्र होते.

गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पाईप जोडण्याचे काम आटोपून परतत असताना ते धरणाच्या पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येतेय. या घटनेमुळे मासरुळ गावावर शोककळा पसरली आहे. मासरुळ येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर पद्मावती धरणात असल्याने पाण्यात बुडालेली आहे. मात्र मोटारपंपचा पाईप निघाल्याने सरपंच पुत्र आणि इतर दोन सहकारी हे पाण्यातून विहिरीपर्यंत गेले.

काम पूर्ण करुन परत येताना पाण्यातून पोहत असताना मधुकर महाले यांचा पोहताना दम तुटला आणि मधुकर पाण्यात बुडाले. सोबतच्या दोन लोकांनी पाण्यातून बाहेर येण्यात यश मिळवले. मात्र मधुकर महाले यांना वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापनाने शोध मोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. मधुकर महाले यांच्या निधनाने महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मासरूळसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश

बुलढाणा जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे.अमडापूर–लवाळा मार्गावरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचा पर्दाफाश झाला आहे

अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी विभागाने संयुक्तपणे रचलेल्या सापळ्यात एका बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे, तब्बल आठ तास संशयित डॉक्टरचा माग काढल्यानंतर डिकॉय केसच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तपासणीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES