...तेव्हापासून मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहतोय; मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान, म्हणाले '2019 पर्यंत नेहमी...'
भारताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र हास्यरेषा पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी वेंगचित्रा संदर्भात भाष्य केले आहे नक्की काय म्हणाले यासंदर्भात सविस्तर वाचा.
महाराष्ट्र हास्यरेषा पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाच्या वेळी एकाच मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाहायला मिळाले. त्यानंतर मोठ्या चर्चा रंगल्या होत्या, यामध्ये बऱ्याच दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी भाष्य देखील केले आहेत. भारताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्र हास्यरेषा पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी वेंगचित्रा संदर्भात भाष्य केले आहे नक्की काय म्हणाले यासंदर्भात सविस्तर वाचा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमामध्ये म्हंटले की, सगळेच लोक डाव्याबाजूला गेले म्हणून मी जाणूनबुजून उजवी बाजूला आलो असे वक्तव्य केले आणि सभागृहामध्ये हसू कोणालाच आवरले नाही. वेंगचित्राच्या कार्याचा गौरव करणारी आणि त्यांच्या इतिहासाचा संकलन करणारी अशा प्रकारचा ग्रंथ संपादीत केला आणि त्याचे संपादन केले. मला राज ठाकरे यांचा फोन आला आणि मला या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि मला देखील त्याचा आनंद वाटला. आशिष शेलार असे म्हणाले की फडणवीस येतात आणि उद्धवजींनी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा मी गेलो आहे आणि 2019 नंतर त्यांनी मला बोलवलच नाही, त्यांच्या फोनची मी वाट बघत आहे असे स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर
पुढे ते म्हणाले की, कार्यक्रमामध्ये शेवटचे भाषण देण्याचा फायदा हा आहे की यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आजतरी मी काहीही बोललो त्यावर काही प्रतिषटकार येणार नाही. मी स्वत: हे संपूर्ण पुस्तक पाहिले आणि जुने वेंगचित्र मिळवणे आणि त्यांचे संदर्भ जोडणे कठीण आहे. 1881 पासून 1997 पर्यंत अशा विविध वेंगचित्रकारांच मनोगत आणि त्यांचे चरित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे यांची देखील कला तुम्हाला पाहायला मिळणार आहे, या कलेमधून तुम्हाला फटकार देखील मारता येतो किंवा अग्रलेख देखील लिहीता येतो.
अनेक वेंगचित्र आमच्यावरही तयार होत असतात पण त्यावर आम्हाला कधी दु:ख होत नाही, त्यातून आनंदच होतो. प्रत्येक व्यक्तीला आपला फोटो सुंदर यावा असे वाटत असते. अनेक कार्यक्रमांमध्ये तुमचे वेंगचित्र काढलेले असते तेव्हा ते कसेही असते तेव्हा ते तुम्हाला आवडते. राज ठाकरेंना मी सांगितले होते की माझे वेंगचित्र काढाल तर माझे नाक मोठे काढा माझे कान मोठे काढा पण माझे पोट मोठे काढू नका असे मी त्यांना सांगितले होते आणि त्यांनी ते ऐकले असे फडणवीसांनी सांगितले.