• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर

2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर

महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाच मंचावर हजेरी लावली.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 29, 2026, 08:50 PM IST|Updated: Oct 29, 2026, 09:21 PM IST
joinshare
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर
Image Credit: 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, राज ठाकरेंचा टोला

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

2

...तेव्हापासून मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहतोय; मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान, म्हणाले '2019 पर्यंत नेहमी...'

3

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

4

2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर

5

भारत पाकिस्तान 30 ऑक्टोबरला भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

29 पर्यंत मुख्यमत्र्यंना ठेवा म्हणजे झालं असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लगावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर झालं होतं. महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाच मंचावर हजेरी लावली. यावेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंनी बोलावलं की मुख्यमंत्री येतात असं विधान केलं होतं. याचा आधार घेत राज ठाकरेंनी हा टोला लगावला. 
 

राज ठाकरेंना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं असता त्यांनी यात महाराष्ट्र असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करायला हवं असं सांगितल्याची माहिती देताना आशिष शेलार उद्धव ठाकरेंना म्हणाले की, राज ठाकरेंनी बोलावल्यानंतर मुख्यमंत्री येतात. याचा आधार घेत राज ठाकरेंनी 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा असा टोला लगावला.

"मी मुख्यमत्र्यांनी बोलावंलं की ते येतात असं आशिष शेलार म्हणाले. मी बोलवत जाईन ते येत जातील असं त्यांचं म्हणणं आहे. 29 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, अजून काय सांगू," असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही आपण 2019 च्या आधी उद्धव ठाकरेंनाही जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा ते आले, पण त्यानंतर ते आले नाहीत असं मिश्किलपणे म्हटलं. 

राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं की, "अशा प्रकारचं एक पुस्तक जमवायचं आणि त्याचे रेफरन्स जमा करायचे हे सोपं नाही. बाळासाहेबांवर एक पुस्तक तयार करताना मला काय त्रास होतो हे समजलं होतं. फोटो तर अनेक मिळतात. पण नुसते फोटोग्राप छापायचे नसतात. मांडणीनुसार ते मिळावे लागतात. पुस्तकाचा ग्राफ नीट गेला पाहिजे. त्याची एक मांडणी असते. पु ल देशपांडे यांच्यावर आधारित एक पुस्तक आहे. त्यात ते दोन वेगळ्या प्रकारे सिगारेट ओढताना दाखवलं आहे. फोटो मिळाले म्हणून ढकलून दिले. पुस्तक बनवण्यासाठी वेल द्यावा लागतोठ". 

 "मी भाग्यवान आहे की, व्यंगचित्रकारांच्या घऱात जन्माला आलो. माझं पहिलं व्यंगचित्र 1980 साली मार्मिकमध्ये छापून आले होते. तेव्हा मी व्यंगचित्र करत नव्हतो, शाळेत होतो. त्यावेळी मार्मिकच्या मधल्या पानावरील चित्र वडील करायचे. मुखपृष्ठ बाळासाहेब करायचे. आतील जत्रा स्केच बाळासाहेब करायचे आणि इंकिंगला वडिलाकडे यायचं आणि नंतर प्रिंटिंगला जायचं. एकदा मी घरी आलो तेव्हा पाहिलं तर वडील इंकिंग करताना दिसले नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, काकाने तुझ्यासाठी व्यंगचित्र पाठवलं आहे इंकिंग कर. मी कसं करु म्हटलं. तुला पेनने करायला सांगितलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यात वेगवेगळे चेहरे होते," अशी आठवण त्यांनी सांगितली. बाळासाहेब मला लाडाने टिनू म्हणायचे. माझ्या टिनूने चितारलेलं उद्याचं चित्र असं त्याचं शीर्षक होतं," अशी आठवण त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी चित्र काढणं, उत्तम ऑइल पेटिंग काढणं यात चित्रकार म्हणून उत्तम हात उद्धवचा होता असं सांगितलं. 
 

यावेळी त्यांनी चित्र काढणं, उत्तम ऑइल पेटिंग काढणं यात चित्रकार म्हणून उत्तम हात उद्धवचा होता. वेडवाकडं कऱणं आमच्यावर होतं असं मिश्लिकपणे म्हटलं. व्यंगचित्र माझी आवडती गोष्ट होती, जे जेमध्ये तीन वर्ष घालवली त्यानंतर बाहेर पडलो, त्यामुळे मी पदवीधर नाही, पण निवडणुकीला उभा राहू शकतो. पदवीधरसाठी पदवीधर लागतो असं नाही. या देसात जी लोकशाही आहे ना असं ते उपहासात्मकपणे म्हणाले. मला एकदा उमेदवाराचा  फॉर्म दाखवला होता, त्यात खाली सही किंवा अंगठा लिहिलं होतं. ते फॉर्म हेच व्यंगचित्र होतं असा टोला त्यांनी लगावला. 
 

"आज एकमेकांवर टीका करणारे, भांडणारे एका व्यासपीठावर कसे आले असा प्रश्न असेल. काही व्यासपीठं अशी असतात ज्यावेळी राजकीय मतभेद गाडून, सोडून त्या व्यासपीठावर एकत्र यावं लागतं. ते व्यासपीठ कलेचं असतं, संगीताचं असतं, कधी लग्नाचं असतं. अशा प्रकारचे मतभेद, टीका करत असले तरी अशा प्रसंगी या गोष्टी बाजूला सारुन व्यासपीठावर येणं ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे," असं त्यांनी म्हटलं. 
 

राज ठाकरेंनी यावेळी व्यंगचित्रांचं दालन उभं राहिलं पाहिजे असं मत मांडलं. देशात इतकी राज्यं नाहीत जिथे इतके व्यंगचित्रकार होऊन गेले आणि होत आहेत. ही परंपरा पुढे नेण्यासाठी शासनाने माझी गरज लागल्यास सांगावं. तसंच चित्रकारा, शिल्पकारांचं दालनही होणं गरजेच आहे असं ते म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
Devendra Fadnavis
Uddhav Thackeray
Ashish Shelar