• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...; चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?

'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...; चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 23, 2026, 13:15 IST|Updated: Nov 23, 2026, 13:19 IST
joinshare
'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...;  चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?
Image Credit: girl dies in dog attack

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...;  चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?

'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...; चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?

2

टिपू सुलतानला धर्मांध, क्रूर का म्हटलं जातं? ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? समजून घ्या 20 मुद्द्यांमधून

3

मोठी बातमी! कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं, चुलत भावांचा जागीच मृत्यू

4

'छत्री धरल्याने रूपाली चाकणकरांना...', 'चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल...'; फोटो शेअर करत शिंदेंच्या नेत्याचा सवाल, 'देवेंद्रजी, जो..'

5

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे भारतासाठी 'करो या मरो'ची मॅच; समोर कोणता संघ? सेमीफायनलसाठी काय करावं लागणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामधून मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एक महिन्यापूर्वी कुत्र्‍याच्या हल्ल्यात जखमी झालेली चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर चिमुकलीला रेबीजची लागण झाली होती. या आठ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी (21 नोव्हेंबर) पहाटे तिची प्राणज्योत मालवली. लेकीच्या निधनामुळे आई - वडिलांवर दु:खाचे डोंगर कोसळलंय. या घटनेमुळे बोरिवडे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे.

नेमकं काय घडलंय?

बोरिवडे इथल्या जवाहर विद्यामंदिर शाळेत दुसरीत शिकणारी रेवती संतोष चौगुले हिच्यावर 20 ऑक्टोबर रोजी भयानक घडलं. विजयादशमीच्या दिवशी शेजाऱ्यांना आपट्याची पाने वाटत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता. पळताना गटारीत पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली होती, मात्र सुरुवातीच्या उपचारानंतर ती बरी होऊन नेहमीसारखी वावरू लागली होती.

महिनाभरानंतर, 19 नोव्हेंबर रोजी रेवतीला अचानक चक्कर येणे, डोळे पांढरे होणे आणि पाण्याची भीती वाटणे अशी रेबीजसदृश लक्षणे जाणवू लागली. यानंतर पालकांनी तिला तातडीने 20 नोव्हेंबरला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं.

हेसुद्धा वाचा -  भीषण अपघातात धुळ्यामधील 9 जणांचा जागीच मृत्यू; एका हट्टामुळे 10 वर्षांचा चिमुकला वाचला, नेमकं झालं काय?

आई-वडिलांची हतबलता अन्...

रेबीजची तीव्र लक्षणे आणि संसर्गाच्या संभाव्य धोक्यामुळे डॉक्टरांनी रेवतीला विलगीकरण कक्षात ठेवून उपचार सुरू होते. त्यामुळे इथे नातेवाईकांना जवळ जाण्यास मज्जाव होता. विलगीकरण कक्षातून बाहेरून पाहणाऱ्या आई-वडिलांना रेवती खाऊ देण्याची आणि घरी नेण्याची आर्त विनवणी सतत करत होती. मात्र संसर्गाच्या नियमांमुळे आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे आई-वडील हतबल झाले होते. अशातच शनिवारी पहाटे रेवतीचा मृत्यू झाल्यामुळे चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
Breaking News