मुंबई ते दिल्ली LPG गॅस सिलेंडरचे आजचे दर किती? जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG ताज्या किंमती
LPG Gas Cylinder Today : LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर सुद्धा होत असतो. तेव्हा तुमच्या शहरातील आजचे ताजे LPG गॅस सिलेंडरचे दर जाणून घेऊयात.
LPG Gas Cylinder Today : भारतातील अनेक ठिकाणी आज घरात ऍन शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरचा उपयोग केला जातो. तर अनेक खाद्यविक्रेते सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर करतात. भारतात 14.2 किलो असणाऱ्या घरगुती सिलेंडर आणि 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरला मोठी मागणी असते. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता LPG च्या किंमती अद्ययावत करतात. आज बुधवार 14 ऑक्टोबर रोजी देशभरातील ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही. याचा अर्थ असा की तेल मार्केटिंग कंपन्यानी आज घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती (14.2 किलो) :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
चंडीगढ़ 951.50 रुपये
कानपुर 928.00 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलो) :
दिल्ली 2,810.00 रुपये
नोएडा 2,747.50 रुपये
मुंबई 2,764.50 रुपये
कोलकाता 2,954.00 रुपये
पटना 3,100.50 रुपये
बेंगलुरु 2,764.00 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये
चंडीगढ़ 2,820.00 रुपये
कानपुर 2,840.00 रुपये
कसा बुक कराल गॅस सिलेंडर?
गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही त्याऐवजी, तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे सर्व बुक करू शकता.
Indane Gas – तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7588888824 या क्रमांकावर REFILL असा संदेश पाठवा.
Bharat Gas – तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 1800224344 या क्रमांकावर Hi असा संदेश पाठवा.
HP Gas – तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 1800224344 या क्रमांकावर संदेश पाठवा