SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे, विदर्भाला अलर्ट; तर 8 राज्यात जोरदार पाऊस

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान आज (25 नोव्हेंबर) कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवविला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 07:46 IST | Updated: Nov 25, 2026, 08:06 IST
Image Credit: maharashtra weather update 25 November
Join

अवघ्या काही दिवसांनी डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. राज्यात काही ठिकाणी पहाटे आणि रात्रीची थंडी जाणवतेय. पण गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हवामानात मोठे बदल पाहिला मिळत आहेत. साधारण गेल्या दोन दिवसांपासून हिवाळ्यात लोकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. पहाटे आणि रात्री जरी गारवा जाणवत असला तरी दिवसा मात्र उन्हाचे चटके जाणवतात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडेच असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत हवामान विभागाने दिला आहे. पण महाराष्ट्रात घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी आज हवामान कोरडे असणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या नवीन अपडेटनुसार अरबी समुद्रातून वाहणाऱ्या या बाष्पयुक्त वाऱ्यांनी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा मार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याऐवजी हवामान ढगाळ आणि दमट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

तर मुंबईत पहाटेच्या वेळी धुके आणि हलक्या धुरक्याचे मिश्रण अनुभवायला मिळाले, ज्यामुळे शहराच्या अनेक भागांवर धुरके पसरले होते आणि दृश्यमानता मध्यम होती. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीची शक्यता कमी झाली असून, डिसेंबरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यानंतरच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे काहीसा गारठा जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडीने उसंत घेतली असून गेल्या पाच दिवसांत नाशिकच्या किमान तापमानात सहा पूर्णांक सात अंश सेल्सिअसची मोठी वाढ होऊन पारा सोळा पूर्णांक सात अंशांवर स्थिरावला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात हवामान ढगाळ व दमट राहण्याची शक्यता असली, तरी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या घाटमाथ्याच्या भागांत आणि विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे.

विदर्भात पडणारे माफक दव आणि गारठा रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक ठरणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे उपनगर आणि संपूर्ण कोकणपट्ट्यात मात्र नागरिकांना थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES