• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मोदींचा गाजावाजा झाला अन् गुंतवणूकदारांचे ₹500000 कोटी बुडाले... 'प्रभाव' कुठे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल; '...तर ही प्रगती नेमकी कोणाची?'

मोदींचा गाजावाजा झाला अन् गुंतवणूकदारांचे ₹500000 कोटी बुडाले... 'प्रभाव' कुठे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल; '...तर ही प्रगती नेमकी कोणाची?'

"सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये दर तीन-चार महिन्यांनी बुडत आहेत. सप्टेंबरमध्ये ‘ब्लॅक वेन्सडे’ला चार लाख कोटी बुडाले. आता ‘ब्लॅक मंडे’ला पाच लाख कोटींचा चुराडा झाला."

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 08:07 IST|Updated: Nov 25, 2026, 08:25 IST
joinshare
मोदींचा गाजावाजा झाला अन् गुंतवणूकदारांचे ₹500000 कोटी बुडाले... 'प्रभाव' कुठे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल; '...तर ही प्रगती नेमकी कोणाची?'
Image Credit: सोमवारच्या पडझडीचा संदर्भ देत साधला निशाणा (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'16 लाखांचा दर निश्चित केला...', खाजगी कार्यक्रमाच्या नावाखाली अभिनेत्याकडे अश्लील मागणी! स्वत: केला खुलासा

'16 लाखांचा दर निश्चित केला...', खाजगी कार्यक्रमाच्या नावाखाली अभिनेत्याकडे अश्लील मागणी! स्वत: केला खुलासा

2

मोदींचा गाजावाजा झाला अन् गुंतवणूकदारांचे ₹500000 कोटी बुडाले... 'प्रभाव' कुठे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल; '...तर ही प्रगती नेमकी कोणाची?'

3

हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे, विदर्भाला अलर्ट; तर 8 राज्यात जोरदार पाऊस

4

आर्यवीर सेहवागची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री, बेस प्राइज किती पाहिलत का?

5

बंद कॅफे उघडला, 8 जण आत गेले अन् रात्री साडेतीन वाजता... 21 वर्षीय तरुणीसोबत सहकाऱ्यांचं हादरवणारं कृत्य; 2 महिलांसहीत तिघांना अटक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

"पंतप्रधान मोदींना ऑस्ट्रेलियातील एका संस्थेने दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी आशियाई नेते ठरवले आणि त्याचवेळी भारतीय शेअर बाजार जोरदार कोसळला. मोदी दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी नेते, भारत आशियातील ‘प्रमुख शक्ती’ वगैरे ठरत असताना भारतीय गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडावेत, हे काही चांगले लक्षण नाही," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. 

भारत जर खरंच आशियातील प्रमुख शक्ती असेल तर...

"ऑस्ट्रेलियातील ‘लोवी इन्स्टिटय़ूट’चा ‘आशिया पॉवर इंडेक्स-2026’ सोमवारी जाहीर झाला. त्यानुसार भारताचे आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली देशाचे स्थान म्हणे कायम राहिले आहे आणि पंतप्रधान मोदी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यानंतरचे दुसरे प्रभावी नेते ठरले आहेत. आता ऑस्ट्रेलियातील ती संस्था जो ‘इंडेक्स’ दाखवीत आहे तो खरा की भारतीय शेअर बाजारातील कोसळलेला ‘सेन्सेक्स’ खरा?" असा खोचक सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. "अंध भक्तांना मोदींचा जयजयकार करण्यासाठी हा इंडेक्स उपयोगी ठरेलही, परंतु सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे काय? भारत जर खरंच आशियातील प्रमुख शक्ती असेल तर ही शक्ती शेअर बाजारातील सोमवारची पडझड रोखण्यात अयशस्वी का ठरली? सोमवारची पडझड चार महिन्यांतील सर्वाधिक मोठी होती. सप्टेंबर महिन्यातही 9 तारीख ही सामान्य गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक वेन्सडे’ ठरली होती," अशी आठवण ठाकरेंच्या शिवसेनेनं करुन दिली आहे.

नक्की वाचा >>
₹9270000 कोटींचं नुकसान... काही तासात गुंतवणूकदार कंगाल; AI कंपन्यांना मोठा धक्का

मोदी सरकार ज्या ‘गतिशील’ अर्थव्यवस्थेचा, जीडीपीतील विक्रमी वाढीचा गाजावाजा करते त्याचा...

"सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी तीन महिन्यांतील नीचांक गाठला होता. त्या पडझडीत गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपये बुडाले होते. आता सोमवारच्या ‘त्सुनामी’त गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी वाहून गेले. सप्टेंबर महिन्यात मोदींसह त्यांचे सरकार 7.8 टक्के जीडीपीचा डंका पिटत होते आणि त्याचवेळी गुंतवणूकदार त्यांचे कष्टाचे चार लाख कोटी गमावत होते. आताही तसेच घडले. भारत प्रमुख शक्ती वगैरे झाल्याच्या बातम्या आल्या आणि गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी बुडाले. हे सगळे म्हणे नफेखोरीच्या लाटेने केले. त्याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढण्याची भीती, रुपयाची घसरगुंडी आणि देशातील वाढत्या महागाईचा विदेशी गुंतवणूकदारांवर वाढलेला दबाव अशीही कारणे आहेत. ती नेहमीचीच आहेत. देशी-परदेशी घडामोडींवर शेअर बाजाराचे गणित अवलंबून असते, हे खरे असले तरी मोदी सरकार ज्या ‘गतिशील’ अर्थव्यवस्थेचा, जीडीपीतील विक्रमी वाढीचा गाजावाजा करते त्याचा प्रभाव या पडझडीवर का दिसत नाही?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. 

...तर ही प्रगती नेमकी कोणाची?

"शेअर बाजारातील सप्टेंबरमधील पडझड अमेरिकेच्या सरकारी बॉण्ड मार्केटमध्ये आलेल्या विक्रीच्या लाटेमुळे झाली होती तर सोमवारची पडझड नफा वसुलीच्या लाटेमुळे झाली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची घसरण झाली आणि गुंतवणूकदारांसाठी हा सोमवार ‘काळा’ ठरला. त्याचा सर्वाधिक फटका बँकिंग क्षेत्राला बसला. मोदी सरकार आर्थिक प्रगतीच्या गमजा तर जोरात करीत असते, परंतु दर चार महिन्यांनी शेअर बाजारात एक ‘ब्लॅक डे’ उगवणार असेल, त्यात लाखो कोटींचा चुराडा होणार असेल तर ही प्रगती नेमकी कोणाची?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे. 

मोदींचा ‘प्रभाव’ कुठे गेला?

"मोदी राजवटीत त्यांच्या उद्योगपती मित्रांची गुंतवणूक अब्जावधींनी वाढत आहे. मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये दर तीन-चार महिन्यांनी बुडत आहेत. सप्टेंबरमध्ये ‘ब्लॅक वेन्सडे’ला चार लाख कोटी बुडाले. आता ‘ब्लॅक मंडे’ला पाच लाख कोटींचा चुराडा झाला. ऑस्ट्रेलियातील एका संस्थेचा ‘इंडेक्स’ पंतप्रधान मोदींना आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे ‘प्रभावी’ नेते ठरवतो, मात्र हा प्रभाव सोमवारी कोसळणारा ‘सेन्सेक्स’ रोखू शकत नाही. मोदींचे ‘अमेरिकन प्रवत्ते’ प्रेसिडंट ट्रम्प भारतीय अर्थव्यवस्थेची भलामण करतात. तरीही भारतीय शेअर बाजारात पुन्हा सर्वाधिक पडझड होते. मोदींचा ‘प्रभाव’ कुठे गेला? असा प्रश्न सामान्य गुंतवणूकदारांना पडला आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
PM Narendra Modi
Stock Market
Shiv Sena UBT