SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रायगडमध्ये 8 महिन्यांच्या लेकराने फुगला गिळला, रुग्णवाहिकेतून जात असताना 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकली अन्...

रायगडमध्ये एक धक्कादायक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आई वडिलांनी आपल्या आठ महिन्यांच्या लेकराला डोळ्यादेखत गमवलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 14:58 IST | Updated: Nov 24, 2026, 15:02 IST
Image Credit: Raigad balloon
Join

अवघ्या एक वर्ष आठ महिन्यांच्या चिमुरड्याने फुगा गिळल्याने त्याचा श्वास कोंडला. मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने आई-वडिलांनी तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, रस्त्यावरील भीषण वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिका तब्बल दीड तास अडकून पडली.

‘माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या,’ अशी आर्त विनवणी आई-वडील करत होते. रुग्णवाहिकेचा सायरनही सतत वाजत होता; मात्र सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतूककोंडीत त्यांची हाक कुणापर्यंत पोहोचली नाही. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने आरांश सुशील ठाकूर या चिमुरड्याने आई-वडिलांच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. अलिबाग तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हेसुद्धा वाचा - 'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...; चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (16 नोव्हेंबर) दुपारी दीडच्या सुमारास चिमुकला आरांश नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. खेळता-खेळता त्याने अचानक फुगा गिळला आणि तो घशात अडकला. काही क्षणांतच त्याचा श्वास गुदमरू लागल्याने पालकांनी त्याला तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका केली. मात्र, बेलकडे-अलिबाग मार्गाचे काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुढे जाण्यासाठी रस्ता मिळेना. तब्बल दीड ते दोन तास दोन तास ही रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडली. अखेर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर  रूग्णवाहिकेसाठी मार्ग मिळाला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुपारी चार वाजता रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी चिमुकल्या आरांशला मृत घोषित केले.

चिमुरड्याच्या आवाजाने हसण्याने खेळण्याने घरभर आनंद पसरला होता, तिथे आज केवळ आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे. या घटनेनंतर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये संतापाची वाट पसरली आहे. मृत चिमुरड्याचे आई-वडील हे भाजी विक्रेते आहेत. बामणगाव येथील नाक्यावर ते व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांना दोन मुले असून आरांश हा धाकटा मुलगा होता, अशी माहिती आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES