SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘उत्सव बांधिलकी'चा! झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी; 'या' ठिकाणी आनंदाचा उत्सव

‘उत्सव बांधिलकीचा – झी 24 तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी’ या विशेष उपक्रमांतर्गत झी २४ तासची टीम बीड, सोलापूर, पाथरी आणि ऐतिहासिक सिंदखेड राजा अशा विविध भागांतील गावांमध्ये पोहोचली.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 07, 2026, 09:12 PM IST | Updated: Nov 07, 2026, 09:17 PM IST
Join

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा काळ. मात्र, दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात यंदा दिवाळीचा आनंद काहीसा हरवला होता. अशाच शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण फुलवण्यासाठी झी २४ तासने यंदाची दिवाळी थेट बळीराजाच्या दारी जाऊन साजरी केली. ‘उत्सव बांधिलकीचा – झी 24 तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी’ या विशेष उपक्रमांतर्गत झी २४ तासची टीम बीड, सोलापूर, पाथरी आणि ऐतिहासिक सिंदखेड राजा अशा विविध भागांतील गावांमध्ये पोहोचली.

केवळ शुभेच्छा देण्यासाठी नव्हे, तर शेतकरी कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग दिला.

सिंदखेड राजा: अभिनेत्री मानसी नाईक यांनी शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
बीड: ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकरी कुटुंबांची भेट घेतली.
पाथरी आणि सोलापूर: अभिनेते प्रवीण तरडे यांनी झी २४ तासच्या टीमसोबत गावोगावी भेट देत या उपक्रमात सहभाग घेतला.

हे ही वाचा

झी 24 तासचा 'उत्सव बांधिलकीचा'; दुष्काळग्रस्त नाईकनगरमधील बळीराजाचा बांधावर दिवाळी साजरी

हा उपक्रम करण्यामागचा उद्देश एकच होता तो म्हणजेच पाण्याअभावी आणि आर्थिक विवंचनेमुळे संघर्ष करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद, आपुलकी आणि सकारात्मकतेचा प्रकाश पोहोचवणे. कारण दिवाळीचा खरा अर्थ केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचा एक दिवा पेटवण्यात आहे. झी 24 तास — केवळ बातम्या देणारं नव्हे, तर समाजाशी नातं जपणारं आणि बांधिलकी निभावणारं आपलं हक्काचं व्यासपीठ! या उपक्रमाची आणि आपल्या गावात घडलेल्या या आनंदाच्या क्षणांची माहिती आपल्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, ही विनंती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES