• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक

2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? हे जाणून ग्राहक शॉक झाले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 07, 2026, 08:31 PM IST|Updated: Nov 07, 2026, 08:36 PM IST
joinshare
2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
‘उत्सव बांधिलकी'चा! झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी; 'या' ठिकाणी आनंदाचा उत्सव

‘उत्सव बांधिलकी'चा! झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी; 'या' ठिकाणी आनंदाचा उत्सव

2

2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक

3

सर्वात जास्त बोली लावूनही फ्लॅट मिळाले नाहीत? NBCC च्या लिलावावर प्रश्नचिन्ह; न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण!

4

झी 24 तासचा 'उत्सव बांधिलकीचा'; दुष्काळग्रस्त नाईकनगरमधील बळीराजाचा बांधावर दिवाळी साजरी

5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह 'झी २४ तास'ची दिवाळी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'उत्सव बांधिकली'चा या उपक्रमाचे कौतुक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold Rate : ऑक्टोबर 2026 मध्ये सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात झालेली घसरण सातत्याने सुरुच आहे.  सोन्याचे दर उच्चांकी दरापेक्षा 46,000 रुपयांनी तर चांदीचे 2.40 लाखांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे दसरा आणि दिवाळीला सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला असली तरी 2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल हे जाणून ग्राहक शॉक झाले आहेत. 

लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 -कॅरेट सोन्याचा दर 2,677 रुपयांनी घसरून सुमारे 1.41 लाख रुपयांवर आला. चांदीचा दर 4,432 रुपयांनी घसरली. चांदीचा दर प्रति किलो 1.83 लाख झाला आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर 2.30 लाख रुपयांवरून घसरून 1.83 लाख रुपये प्रति किलो झाला.  29 जानेवारी 2026 रोजी सोन्याने 1.76 लाख रुपयांचा तर, चांदीने 3.86 लाख रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

2027 दिवाळीत सोनं महाग होणार की स्वस्त?

सोनं चांदीच्या दरात सध्या प्रचंड मोठी उलथापालथ सुरु आहे. सोनं चांदीच्या दरात पडझड कायम राहणार आहे. सोन्याच्या दरात प्रचंड तेजी येण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. पुढील वर्षभरात सोन्याच्या किंमती 20 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. 2027  च्या दिवाळीपर्यंत 1 तोळा सोन्याच्या दर  1.75 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर  प्रति औंस सुमारे 4,950 डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

10 वर्षांत सोन्याच्या दरात सुमारे 4.77 पट वाढ 

सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मागील 10  वर्षांत सोन्याच्या दरात सुमारे 4.77 पट वाढ झाली आहे.  सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2016 मध्ये दिवाळीत  सोन्याचा दर 30,590 तोळा होता. 2026 च्या दिवाळीत सोन्याचा दर 1,45,915 पोहचला आहे. 10 वर्षात सोन्याच्या दरात ४.७७ पटीने वाढ झाली आहे. 2016 मध्ये सोन्यात 
1 लाखांची गुंतवणक करणाऱ्या फायदा झाला आहे. 1 लाखात खरेदी केलेल्या सोन्याचे मूल्य  4.77 लाख झाले आहे.

सोन्याच्या दरात अस्थिरता का आली आहे?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 2027 मध्ये व्याजदर वाढवण्याऐवजी ते कमी करण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा सोन्याचा दरात भूकंप येऊ शकतो. कमी व्याजदरांमुळे डॉलर आणि बॉण्डवरील परतावा कमकुवत होऊ शकतो. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक आकर्षक ठरू शकते. चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price