CM Devendra Fadnavis : यंदा महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. बळीराजा दुष्काळात होरपळत आहे. देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार आहे. 'झी २४ तास'ने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. उत्सव बांधिकलीचा.. 'झी २४ तास'ची दिवाळी,
बळीराजाच्या दारी. हा विशेष उपक्रम 'झी २४ तास'नं राबवला. 'झी २४ तास'च्या उत्सव बांधिलकीचा या विशेष उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'झी २४ तास'चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यासह 'झी २४ तास'च्या टीमने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या.
'झी २४ तास'च्या या उपक्रमात प्रवीण तरडे, अलका कुबल, मानसी नाईक अशा प्रसिद्ध कलाकरांनीही सहभाग घेतला. 'झी २४ तास'च्या या उपक्रमाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'झी २४ तास'चं कौतुक केले.