व्हायरल न्यूज : सोशल मिडियावर एक पाणीपुरी विक्रेता चांगलाच व्हायरल झाला आहे. या पाणीपुरी विक्रेत्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या घराबाहेर स्कॉर्पिओसह 4 अलिशान कार उभ्या असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमुळे त्याची कमाई उघड झाली आहे. त्याची कमाई आणि डिग्री पाहून सगळे शॉक झाले आहेत.
एका आयआयटी पदवीधर तरुणीने पाणीपुरी विक्रेत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही तरुणी या पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलवर पाणीपुरी खाण्यासाठी गेला होता. पाणीपुरी खात असताना तिने पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारल्या. बोलता बोलता पाणीपुरी विक्रेत्याने त्याचा कमाईचा आकडा सांगितला. हा आकडा ऐकून तरुणी शॉक झाली. पाणीपुरी विक्रेत्याची कमाई, कामाचे तास आणि जीवनशैली पाहून या सुशिक्षित तरुणीला तिच्या कॉर्पोरेट नोकरीबद्दल अत्यंत वाईट वाटले.
आयआयटी गुवाहाटीची पदवीधर असलेल्या वैष्णवी श्रीवास्तवने, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर आणि आयआयटी हैदराबाद येथील तिच्या तीन मैत्रिणींसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे हा पाणीपुरी विक्रेता ट्रेंडिंगमध्ये आला.
बोलता बोलता या पाणीपुरी विक्रेत्याने तरुणीला आपल्या कमाईचा आकडा सांगितला. एका पाणीपुरी स्टॉलवरुन महिन्याला 1,20,000 रुपये कमावल्याचे त्याने सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही त्याची एकूण विक्री नसून, सर्व खर्च वजा केल्यानंतरचा निव्वळ नफा आहे.
पाणीपुरी विक्रेता दुपारी 4 वाजता स्टॉल लावतो. रात्री 10 वाजेपर्यंत घरी जातो. दिवसातून फक्त सहा तासच तो काम करतो. तो स्वतःचा मालक आहे. त्याला वाटलं तर तो रविवारी सुट्टी घेतो. पाणीपुरी विक्रेता गप्पा मारताना जे काही सांगत होता ते एेकून या तरुणीला एका मागून एक आश्चर्याचे धक्के बसत होते.
या पाणीपुरी विक्रेत्याचे 4 स्टॉल आहेत. या चौघांचा नफा एकत्र केल्यास हा पाणीपुरी विक्रेता महिन्याला साडेचार लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावतो. हा पाणीपुरी विक्रेता अलिशान घरात राहतो. त्याच्या दारात स्कॉर्पिओसह 4 कार उभ्या आहेत. या तरुणीने सोशल मिडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. कमेंट करणारे पाणीपुरी विक्रेत्याची कमाई पाहून थक्क झाले आहेत. आमच्या डिग्रीचा काय उपयोग? असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहे. तर, चला नोकरी सोडून पाणीपुरीचा ठेला टाकूया अशी मजेशीर कमेंट काहीजण करत आहेत.