दिवाळीच्या या सणाला आपण घरी वेगवेगळे पदार्थ तयार करतो, ही दिवाळी स्पेशल करण्यासाठी तुम्हाला या लेखामध्ये एक खास पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. मिठाईच्या दुकानामधील भेसळयुक्त खाण्यापेक्षा ताजे आणि शुद्ध साहित्य वापरून घरीच मिठाई बनवणे उत्तम ठरते. बालुशाही ही भारतातील एक पारंपरिक आणि प्रसिद्ध मिठाई आहे. आज तुम्हाला या लेखामध्ये घरच्या घरी बालुशाही कशी तयार करायची यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
500 ग्रॅम पीठ
125 ग्रॅम देशी तूप
100 ग्रॅम दही
अर्धा चमचा बेकिंग पावडर
1/4 चमचा बेकिंग सोडा
आवश्यकतेनुसार पाणी द्या
तळण्यासाठी तूप किंवा तेल
500 ग्रॅम साखर
250 मिली पाणी
अर्धा चमचा वेलची पूड
हे ही वाचा
घरच्या घरी बालुशाही तयार करण्यासाठी सर्वात आधी मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करा तूप घालून हाताने मळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडे दही आणि पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पीठ जास्त मळू नये, पीठ जास्त प्रमाणामध्ये मळले जाणार नाही हे तपासण्यासाठी, हातात थोडे पीठ घेऊन मुठीत दाबून बघा. दाबल्यावर पिठाला लाडूसारखा घट्टपणा आला आणि सोडल्यावर तो तसाच राहिला, तर पीठ योग्य प्रकारे मळले आहे. बालुशाहीचा आकार देण्याआधी मळलेले पीठ 15-20 मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवा त्यानंतर त्याचे छोटे गोळे तयार करा आणि मध्यभागी अंगठ्याने हलकासा खड्डा करा. बालुशाहीचा आकार दिल्यानंतर प्रथम एका कढईत पुरेसे तूप किंवा तेल घाला. सुरुवातीला तेल जास्त गरम करू नका, कारण बालुशाही घालण्यापूर्वी ते थोडे कोमट असावे.
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बालुशाही घाला आणि आच अगदी मंच आचेवर ठेवा त्यामुळे बालुशाही हळूहळू फुगुन वर येईल. एक बाजू हलक्या सोनेरी रंगाची होईल तेव्हा ती काळजीपूर्वक पलटा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंग येईल तोपर्यत तळा.
बालुशाहीचा पाक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये 400 ग्रॅम साखत त्यामध्ये घाला आणि 200 मिली पाणी घाला आणि त्यानंतर त्यामध्ये वेलची आणि केशर घालून साखर विरघळेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. उकळी आल्यावर वर आलेला फेस काढून टाका. सुमारे 5-8 मिनिटे शिजवून त्याचा घट्टपणा तपासा. पाक तयार झाल्यानंतर बालुशाही तळल्यानंतर 3-5 मिनिटे तशीच ठेवा. साखरेचा पाक घालताना तो किंचित कोमट असावा. बालुशाही पाकात ठेवा. सुमारे 10-15 मिनिटे तशीच राहू द्या, मध्ये एकदा उलटून घ्या. नंतर बाहेर काढून जाळीच्या रॅकवर किंवा प्लेटवर ठेवा.